Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यादेशातील पहिले संविधान संमेलन पुण्यात होणार 

देशातील पहिले संविधान संमेलन पुण्यात होणार 

 विकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

संविधानाच्या मूल्यांना सन्मान देण्यासाठी आयोजित देशातील पहिले संविधान सन्मान संमेलन यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे. प्रबुद्ध भारत आणि बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजप्रबोधनकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक माजी सनदी अधिकारी विकास दिव्यकिर्ती यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर असणार आहेत. 

विकास दिव्यकिर्ती हे भारतभर UPSC मार्गदर्शक, लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. दृष्टी IAS या प्रतिष्ठित संस्थेचे संस्थापक असलेल्या दिव्यकिर्ती यांनी हजारो विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षित केले आहे. त्यांचे संविधान, समाजशास्त्र आणि प्रशासनशास्त्र यावरील मार्गदर्शन विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांच्या सहज आणि स्पष्ट शैलीमुळे ते युवा पिढीमध्ये प्रेरणादायी वक्ते म्हणून ओळखले जातात. 

संमेलनात संविधानाच्या विविध अंगांवर तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे आणि संवाद होणार आहेत. सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाबाबत सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रबुद्ध भारतच्या संपादक मंडळाकडून कळवण्यात आले आहे.

 —  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!