Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यादोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र; कोल्हापूरच्या ग्रामीण राजकारणात नवा ट्विस्ट

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र; कोल्हापूरच्या ग्रामीण राजकारणात नवा ट्विस्ट

पुणे २४तास ः- विधानसभा फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कायमचा दुभंग झाल्याचे मानले जाणारे शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी गट आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. चंदगड नगर परिषद निवडणुकीतून आकाराला आलेले हे समीकरण आता गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांपर्यंत विस्तारत असून, या भागात थेट भाजपविरोधी लढतीचे संकेत मिळत आहेत.

नगरपालिका निवडणुकांत महायुती एकत्र लढली असली, तरी जागावाटपातील मतभेदांमुळे बहुतांश ठिकाणी घटक पक्ष स्वतंत्र उतरले होते. मात्र चंदगडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वेगळे राजकीय चित्र निर्माण झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या समन्वयाने ताकद दाखवली गेली, तरी भाजप समर्थित आमदार शिवाजीराव पाटील यांनी पालिकेवरील वर्चस्व कायम राखले.

मात्र महिनाभरातच हेच राष्ट्रवादी समीकरण अधिक व्यापक रूप घेत असून, भाजपला रामराम ठोकत संग्रामसिंह कुपेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ही आघाडी बळकट झाल्याचे मानले जाते. याचवेळी भाजपकडूनही हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील आणि मानसिंग खराटे यांच्या गटाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिंदेसेना, ठाकरेसेना आणि काँग्रेस यांची तिसरी आघाडी मैदानात असल्याने कोल्हापूरच्या दक्षिण भागात द्विपक्षीय नव्हे, तर तिरंगी आणि अधिक चुरशीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादीचे दोन्ही गट स्थानिक राजकारणासाठी एकत्र येत असतील, तर ही केवळ तात्पुरती निवडणूक युती आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय पुनर्रचनेची नांदी— हा प्रश्न विचारवंतांनाही संभ्रमात टाकणारा ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!