Friday, August 21, 2026
spot_img
Homeक्राईमधुलवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ॲलर्ट; ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या मोहिमेसाठी ८० पथके मध्यरात्रीपर्यंत कार्यरत

धुलवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ॲलर्ट; ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या मोहिमेसाठी ८० पथके मध्यरात्रीपर्यंत कार्यरत

पुणे :  (पुणे 24 तास ब्युरो )

शुक्रवारी होणार्‍या धुलवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. आहे. ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरात वेगवेगळ्या भागात स्थानिक पोलिस आणि वाहतूक विभागाने तब्बल ८० पथके नेमण्यात येणार आहे़. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी २ पथके असणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून मध्यरात्री दिड वाजेपर्यंत नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली जाणार आहे.

होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड साजरी केली जाते. होळीची राख घेऊन ती एकमेकांना लावण्याची पारंपारिक प्रथा आता मागे पडली आहे. उत्तर भारतीयांच्या वाढत्या प्रभावामुळे धुलवडीच्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यावेळी अनेक जण भांग पिणे, दारु पिऊन रंग एकमेकांवर उधळतात. तसेच ट्रिपल सीट बसून वाहनावरुन वेगाने जात असतात. अशा तरुणाईकडून अपघात होऊ नयेत, यासाठी शहर पोलीस दलाने विशेष मोहिम आखली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून मध्यरात्री दीड वाजेपर्यत सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येणार असून मद्य प्राशन करुन वाहन चालवत असेल तर त्यांच्यावर जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे.
धुलवडीला अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असते. अशा पार्ट्यांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. अशा पार्ट्यांमधून अंमली पदार्थांचे सेवन होत नाही ना, याकडे पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
उत्सव साजरा करताना मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका, असे आवाहन शहर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!