Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यानवकल्पना आणि कौशल्यांचा उपयोग समाज हितासाठी करावा - अस्मिता एम.

नवकल्पना आणि कौशल्यांचा उपयोग समाज हितासाठी करावा – अस्मिता एम.

पीसीयू मध्ये “टेक्निऑन २०२५” उपक्रम

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

संशोधन व तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास, विविध उद्योगांवरील त्याचा परिणाम, शासन व उद्योजकांचे त्याबाबत धोरण हे सर्व आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनांना व्यवहारिक जोड देऊन आपल्या कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी करावा असे मार्गदर्शन अस्मिता एम. यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) येथे “टेक्निऑन २०२५” या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अस्मिता एम. बोलत होते. या टेक्निऑन मध्ये ९६६ विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखांतून सहभागी होऊन १८८ प्रोजेक्ट्स, पोस्टर्स आणि मॉडेल्स चे सादरीकरण केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सस्टेनेबिलिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यावेळी पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग दुबई चे प्रा. डॉ. अमोल गोरे, एसओइएनटी विभागप्रमुख डॉ. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमोल गोरे यांनी शैक्षणिक व औद्योगिक अनुभवातून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधील प्रक्रियांचे ऑप्टिमायझेशन, समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जागतिक अभियांत्रिकीतील बदल समजून घेण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी भौगोलिक व तांत्रिक सीमारेषा ओलांडून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून आपले करिअर घडवावे असे सांगितले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले की, टेक्निऑन मधील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा आणि संशोधन प्रख्यात अशा प्राध्यापक व उद्योग तज्ज्ञांसमोर मांडण्याची संधी मिळते.
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. “टेक्निऑन २०२५” हे आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे आणि सर्जनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे, असे डॉ. रामदास बिरादार यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!