Homeताज्या बातम्यानिमित्त गुलकंदचे, हास्यजत्रा टीमसोबत दिलखुलास संवाद

निमित्त गुलकंदचे, हास्यजत्रा टीमसोबत दिलखुलास संवाद

समीर चौघुले, सई ताम्हणकर, मोटे, गोस्वामींची उपस्थिती

दिशा सोशल फाऊंडेशनचा २८ एप्रिलला कार्यक्रम

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी माणसाच्या घराघरात, मनामनात अढळ स्थान मिळवलेल्या `महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या टीमसोबत दिलखुलास संवाद साधण्याचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने २८ एप्रिलला चिंचवड येथे आयोजित केला आहे. निमित्त आहे, आगामी ‘गुलकंद’ या सिनेमाचे.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये बहुचर्चित ठरलेला ‘गुलकंद’ हा सिनेमा १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचे औचित्य साधून या सिनेमातील दिग्गजांशी संवाद साधत खुमारदार किस्से आणि गप्पांचा रंगतदार कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने आयोजित केला आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी, २८ एप्रिल, सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अभिनेते समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा वडनेरकर, लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असून प्रथम येईल, त्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
हास्यजत्रेच्या यशानंतर गुलकंदची निर्मिती

गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा ही सोनी मराठीवरील मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आतापर्यंत जवळपास ९०० भाग प्रसारित झाले आहेत. विनोदनिर्मितीचे कुलगुरू म्हणून ख्याती असणारे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या वेटक्लाऊड प्रॉडक्शनच्या वतीने या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. हास्यजत्रेच्या तुफान यशानंतर याच वेटक्लाऊडने निर्मिती केलेला ‘गुलकंद’ हा पहिलाच चित्रपट आहे. कौटुंबिक, विनोदी प्रकारातील या चित्रपटाचा नायक म्हणून समीर चौघुले यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सई ताम्हणकर ही समीरच्या नायिकेच्या भूमिकेत आहे, हे गुलकंदचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, प्रसाद ओक, ईशा वडनेरकर, वनिता खरात, तेजस राऊत, जुई भागवत यांच्यासह मोटे आणि गोस्वामी यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!