Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे आश्वासन आणि पिंपळे निलख, विशालनगर येथील हंडा मोर्चा स्थगित -...

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे आश्वासन आणि पिंपळे निलख, विशालनगर येथील हंडा मोर्चा स्थगित – सचिन साठे

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

) मागील दोन महिन्यापासून पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत होता. याप्रश्नी महानगरपालिकेच्या निष्क्रिय, निद्रिस्त पाणीपुरवठा विभागाला जाग आणण्यासाठी भाजपा नेते सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ प्रभाग कार्यालय वर शुक्रवारी ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा या भागातील सर्व नागरिकांनी दिला होता.
मनपा ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हेमंत देसाई आणि कनिष्ठ अभियंता साकेत पावरा यांनी सचिन साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी भेट देऊन तेथील नागरिकांसोबत बैठक घेतली यावेळी माजी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, अशोक बालवडकर, रवींद्र काटे, आनंद कुंभार, नरेंद्र गायकवाड, काळूशेठ नांदगुडे, नागेश जाधव, पंडित गराडे, साहेबराव नांदगुडे, महेंद्र बिराजदार, संजय पटेल, विजय पाटुकले, सचिन जाधव, विनायक बोडके, राजाभाऊ मासूळकर, गणेश देशमुख, प्रमोद दळवी आणि पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागातील रहिवासी, सोसायट्यांचे प्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते.
मनपा ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हेमंत देसाई यांनी या बैठकीत उपस्थित नागरिकांना जाहीर आश्वासन दिले की, यापुढे पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही. तसेच पाणीपुरवठा बाबतच्या तांत्रिक समस्या लवकरच दूर केल्या जातील आणि येथील नागरिकांना पूर्ण क्षमतेने नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल त्यामुळे नागरिकांनी शुक्रवारी आयोजित केलेला हंडा मोर्चा स्थगित करावा अशी विनंती केली.

पाणीपुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शुक्रवारी (दि.११ एप्रिल) आयोजित केलेला हंडा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे अशी माहिती सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!