Wednesday, October 14, 2026
spot_img
Homeक्राईमपुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने केली अटक

पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने केली अटक

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये
कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय ५७ वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५७ वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश आहे. ‘लाचलुचपत’च्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे‌. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितले.

याप्रकरणी एका ५७ वर्षीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकासकामे पूर्ण केली होती. या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. ही रक्कम हवी असेल तर, अदा करावयाच्या एकूण रकमेच्या २ टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार १ लाख ४२ हजार रूपायांची लाच स्वीकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव हे करत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ .शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी सांगितले.

ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक थांबवा :- रवींद्र भोसले

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना विकासकामे देण्याची तरतूद सरकारने केली आहे. यानुसार आम्ही सर्व कंत्राटदार इमानेइतबारे कामे पूर्ण करतो. परंतु केलेल्या कामांचा मोबदला मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांची मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ही पिळवणूक कायमस्वरूपी थांबावी, अशी अपेक्षा पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे.

कोणी लाच मागत असेल तर, नागरिकांनी येथे संपर्क साधावा

कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांचे खासगी दलाल (एजंट) हे कोणतेही सरकारी काम करून देण्यासा लाचेची मागणी करीत असल्यास, नागरिकांनी याबाबत तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणे आवश्यक आहे. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक

१) पुणे दुरध्वनी क्रमांक (०२०) २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३.

२) व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांक मुंबई :- ९९३०९९७७०

३) ई-मेलआयडी पुणे :- dyspacbpune@mahapolice.gov.in

४) वेबसाईट :- www.achmaharashtra.gov.in

५) ऑनलाईन तक्रार अॅप :- www.achmaharashtra.net.in.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!