Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुणे जिल्ह्यच्या विकासकामात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढविणार

पुणे जिल्ह्यच्या विकासकामात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढविणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा (ए. आय. टेक्नॉलॉजी) अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. यामुळे पर्यावरण व परिपूरक अर्थव्यवस्था, उद्योग क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होऊ शकेल. यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे ए. आय. चे टूल हबची (कृत्रीम बुद्धीमत्ता साधनांचे मध्यवर्ती केंद्र) उभारणी करणे विचाराधीन आहे. या टूल हबसाठी राज्य सरकार ३०० एकर जमीन उपलब्ध करून देईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.५ एप्रिल) पुण्यात केली. 

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत केल्या जाणाऱ्या आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या आवश्यक विकासकामांचा उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा घेतला.या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका  आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, मैत्री संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी ए.आय.  टूल हब उभारणे, पुरंदर येथील विमानतळासाठी तातडीने जमिन संपादन करणे, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी सेंद्रिय कचऱ्यातून गॅस निर्मिती प्रकल्प राबविणे, डी. पी. रोडची आखणी करणे, शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे,  रस्ते जास्तीत जास्त रुंद करणे आवश्यक आहे. ही सर्व कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ॲग्री हॅकेथॉन आयोजित करण्यात आल्याचे सांगून कृषी, पर्यटन व उद्योग विकास आराखडा सादर केला. 

या बैठकीत खासगी गुंतवणूक वाढवणे, पुणे झोपडपट्टीमुक्त करणे, कृषी क्षेत्रात ए.आय.चा वापर, वाहतूक व्यवस्था, रिंग रोडसाठीचे भूसंपादन, निर्यात वृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय,  उद्योग सेवा केंद्र स्थापन करणे, पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविणे, बायो-एनर्जी प्रकल्प आणि मेट्रो मार्गाचा विस्तार वाढविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!