Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य यात्री संमेलन

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य यात्री संमेलन

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य यात्री संमेलन
ही अभिमानाची बाब-मराठी भाषा मंत्री उदय सामंत
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरीता महादजी शिंदे एक्सप्रेस पुणे येथून दिल्लीकरीता रवाना

पुणे, ( पुणे 24 तास ब्युरो )

पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात पाहिले मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची बाब असून प्रवासात ३० तास हे संमेलन चालणार आहे. अशी माहिती मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांनी दिली. दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणासाठी जाणाऱ्या साहित्य रसिकांच्या महादजी शिंदे एक्सप्रेला मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून पुणे रेल्वे स्थानक येथून रवाना करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री श्री सामंत म्हणाले, मराठी साहित्य यात्री संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे. ही माझ्या साठी भाग्याची बाब आहे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कवी कुसुमाग्रज यांचे नावाने मराठी अध्यसन केंद्र सुरु करण्याचा निर्णय जेनयूच्या कौन्सिल ने घेतला आहे, हा मराठी भाषेचा मान असून मराठी बोलणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा मान आहे. ही अनेक वर्षाची मागणी होती ती आता पूर्ण होत आहे.जेनयू मध्ये एम ए मराठी चा अभ्यासक्रम २७ पासून सुरु होत आहे. दिल्ली मध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी घडता आहेत. मराठीसाठी शासन सर्वोतोपरी मदत करित आहे. असे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रयाणापूर्वी पुस्तक दिंडी काढण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या विशेष रेल्वेत १ हजार २०० ज्येष्ठ साहित्यिक प्रवास करीत आहेत.मराठी भाषा मंत्री श्री. सामंत स्वतः प्रवास करुन साहित्यकांशी संवाद साधत आहे. दरम्यान या रेल्वेमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही रेल्वे २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, मराठी साहित्य यात्री संमेलनाचे संमेलनाध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ कार्याध्यक्ष डॉ. शरद गोरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संगिता बर्वे आदी उपस्थित हाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!