Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण...

पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गेच करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

पुणे (पुणे 24 तास ब्युरो

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने प्रकल्पाचा ५०% वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी (Alignment) सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील ग्रामीण भागात विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाने ५०% आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुणे-नाशिक या २३६ कि. लांबीच्या नवीन सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ची नियुक्ती करून आर्थिक सहभाग देण्यास शासन निर्णय क्र. आरएलवाय -०२१२/१८०/प्र. क्र. ३७/ परिवहन-५ दि. १५.०४.२०२१ अन्वये मान्यता देण्यात आली होती. सदर प्रकल्प र १६०३९ कोटी (आत्ता ₹ २५००० कोटी) एवढ्या एकूण प्रकल्प खर्च रकमेच्या मर्यादेत ६०% कर्ज आणि ४०% समाभागमुल्य या प्रमाणात राबवण्यास मान्यता देण्यात आली.

मात्र डीपीआरमधील प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जात होते जिथे राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्र (एनसीआरए), पुणे यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळा स्थापित केली आहे. जीएमआरटी वेधशाळेच्या कार्यक्षेत्रातून प्रस्तावित रेल्वे मार्गाचा जात असल्याने मा. रेल्वे मंत्री यांनी दि. १८.१२.२०२४ रोजी सदर पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा ८० कि. वाळसा घालून करण्यात आला. तसेच सदर रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ऐवजी मध्य रेल्वे मार्फत करण्याचे मा. रेल्वे मंत्री यांनी जाहीर केले. सदर संरेखन कुठल्याही परिस्थितीत पुणे नाशिक थेट रेल्वे मार्गास अनुसरून नाही ज्याचा सर्वाधिक फटका पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला देखील बसणार असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत नाशिक वाढवण पोर्ट रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे (FLS) नुकताच मंजूर केला आहे. पुणे नाशिक थेट रेल्वे मार्ग पश्चिम महाराष्ट्रातील कंटेनर मालवाहतूक मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला बायपास करून थेट नाशिक मार्गे वाढवण बंदराला जोडेल ज्यामुळे राज्याला शाश्वत पर्याय उपलब्ध असेल. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ची नियुक्ती केल्यास रेल्वे नियमांचे पालन करीत प्रकल्पाचे नियोजन आणि अमंलबजावणी करण्याची संपूर्ण जवाबदारी राज्य शासन महारेल कडे सोपवू शकते ज्याचा सर्वाधिक फायदा पुणे नाशिक औद्योगिक पट्टयाला मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत निर्यातक्षम कंटेनर मालवाहतूक रेल्वेने वाढवण बंदराला पाठवण्यासाठी राज्याला शाश्वत पर्याय उपलब्ध करेल त्यामुळे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने ५०% वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी (Alignment) सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर राजगुरुनगर चाकण मार्गेच होण्यास पूर्व शर्त करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!