Sunday, August 23, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुणे शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकरीता काँग्रेस पक्ष नेहमी कटिबध्द.

पुणे शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांकरीता काँग्रेस पक्ष नेहमी कटिबध्द.

– बी.एम.संदिप, सहप्रभारी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यावर संपूर्णपणे राज्यशासनाचे नियंत्रण आहे. महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महानगरपालिकेतील प्रशासन बिघडलेले असून सर्वसामान्य जनतेला सोयी – सुविधा मिळत नाहीत व त्यांना त्रास सहन करावा लागतो. भाजपा व महायुतीच्या मर्जीतले प्रशासन मनमानी कारभार करीत आहे. तसेच दिवसेंदिवस शैक्षणिक, आरोग्य, पाणी, रस्ते व सुरक्षेचा प्रश्न त्याचबरोबर पुण्यातील भाजप नेत्यांच्या आशिर्वादाने महानगरपालिकेत होणारा  भ्रष्टाचाराचा प्रश्न भेडसावत आहे, म्हणून या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘सत्तेत येण्या अगोदर ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे मोदी सरकारने जाहिर केले होते. परंतु आता महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश भ्रष्टाचाराचे कुरण झाला असून भेष्ट व आत्याचारी मंत्र्याच्या विरोधात हे भाजप सरकार कोणत्याही कारवाया करताना दिसत नसल्याचे महाराष्ट्रातील अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. तीन महिने एका मंत्र्यांचा पुरावे असताना राजीनामा न घेणे तसेच कोर्टाने ताशेरे ओढलेल्या मंत्र्यांस अभय देणे हे त्याचे धोतक असल्याचे बी. एम. संदिप यांनी सांगितले.

या पुढे काँग्रेस पक्ष निवडणुका होवोत अथवा न होवोत जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी या पुढे तीव्र लढा उभारणार व प्रशासनाचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार असे प्रतिपादन बी. एम. संदिप यांनी केले.’’

यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यातील ज्वलंत प्रश्नांवरती भाष्य करताना सांगितले की, वाहतुक, पाणी, ड्रेनेज, खड्डे पडलेले रस्ते, निवडणुकी आगोदर लाडकी झालेली बहिण निवडणुकीनंतर तीची पात्रता तपासण्याचे काम या कुचकामी सरकारने केले आहे. तीन ते चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेतील अंध, अपंग, विधवा, निराधार, ज्येष्ठ नागरिक यांच्या पेन्शन्स गेल्या तीन महिन्यांपासून डीबीटी च्या नावाखाली थांबविण्यचे काम या भाजप सरकारने केले आहे.

..2..

महानगरपालिकेतील अनेक प्रकरणात भ्रष्टाचार उघड झाला असून त्याच्यातील दोषींवर कोणतीही कारवाई होत नाही अशा सर्व भ्रष्टाचाराच्या विरोधात व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात यापुढे काँग्रेस पक्ष तीव्र लढा देणार आहे. पुणे शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्याच्या विरोधातही महिला सुरक्षेच्या बाबतीत काँग्रेस पक्ष कटिबध्द असणार आहे.’’

यानंतर माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक अविनाश बागवे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित दरेकर यांनी केले तर आभार भवानी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित यादव यांनी मानले.

यानंतर पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली  मराठे, सुजाता शेट्टी, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन, संतोष हंगरगी, सदानंद शेट्टी, नीता रजपूत, सुनिल शिंदे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, रविंद्र माझिरे, विशाल जाधव, हेमंत राजभोज, संतोष आरडे, रमेश सकट, दिलीप तुपे, रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संतोष पाटोळे, दिलीप तुपे, समीर शेख, सेल्वराज ॲन्थोनी, अश्विनी डॅनिलय लांडगे, विल्सन चंदवेल, संदिप मोकाटे, सचिन दुर्गाडे, प्रदिप परदेशी, गणेश गुगळे, इरफान शेख, मतीन शेख, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सीमा सावंत, प्रकाश पवार, मंदा जाधव, ज्योती परदेशी, शोभा आरूडे, प्रियंका मधाळे, कविता भागवत, कांचन बालनायक, शारदा वीर, वाल्मिक जगताप, गुलाब नेटके, हरिदास चव्‍हाण, नारायण पोटोळे, रवि आरडे, अविनाश अडसूळ, अनिल धिमधिमे, शिलार रतनगिरी, भगवान कडू, भुषण रानभरे, संदिप कांबळे, ॲड. नंदलाल धिवार, ॲड. रमेश पवळे, किशोर मारणे, मीना हुबळीकर आदींसह असंख्य काँग्रेसजन सदर मोर्चात सहभागी झाले होते. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!