Homeताज्या बातम्यापुण्यात कॉग्रेसला खिडार

पुण्यात कॉग्रेसला खिडार

नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम, लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे :(पुणे 24 तास ब्युरो )

राजकारणात करिअर घडवण्यासाठी कार्यकर्ता आपला संपूर्ण वेळ आणि मेहनत झोकून देतो. मात्र, काही नेते कार्यकर्त्यांना मोठं होण्याची संधी देत नाहीत. याच कारणामुळे पुण्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सोबत काही अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप प्रवेशाची ठोस तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे अंतिम टप्पे पार पडले आहेत.

रोहन सुरवसे पाटील हे काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाला समर्थन देत त्यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर त्यांना पोलिस कोठडीला सामोरे जावे लागले आणि ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता मिळाली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून पक्षसंघटनासाठी काम केले.

तथापि, अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याशिवाय, शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमध्ये जुन्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. या सर्व कारणांमुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या विभक्त होण्याला सामोरे जावे लागू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!