Homeपुणेप्रगती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा- शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना...

प्रगती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पंचवीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा
– शिक्षक, विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

(पुणे २४ तास ब्युरो)

प्रगती महाविद्यालयाच्या प्रगतीचे शिलेदार या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थिती लावलेले शिक्षक आणि माजी विद्यार्थी.

पुणे: दहावीच्या परीक्षेपूर्वी निरोप घेतलेल्या हडपसर येथील प्रगती महाविद्यालयातील शाळेतील माजी विद्यार्थ्यांची शाळा 25 वर्षांनी पुन्हा भरली. प्रगतीच्या शिलेदारांचे स्नेहसंमेलन हा कार्यक्रम रविवारी (दि. 23) मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षक आणि सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शिक्षक शिवाजी चव्हाण, सुभाष भारद्वाज, एन. एम. कुंडीयावाला, अरुण झांबरे, निजाम शेख, विठ्ठल कोंडे, संजय पाटील, भारत कदम, लक्ष्मण कणसे, सरोज अस्मर, रामचंद्र गाढवे रेखा आबनावे तसेच शाळेतील सध्याच्या शिक्षिका कोलते मॅडम आणि शिक्षेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

यावेळी विद्यार्थ्यांना शिकवणारे काही शिक्षक निवृत्त झाले ते गावाला असतानाही त्यांनी पुण्यात येऊन कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. तर बाहेर गावी असलेली मुले तसेच सासरी नांदत असलेल्या मुलींनीही मुंबई, सोलापूर तसेच इतर भागातून  येऊन कार्यक्रमास हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेदहा वाजता  कार्यक्रमाची सुरवात काळेपडळ येथील शाळेच्या प्रांगणात राष्ट्रगीताने झाली. क्रीडा शिक्षिका रेखा आबनावे यांनी सर्वाना राष्ट्रगीतासाठी रांगेत उभे केले. राष्ट्रगीतानंतर सर्व माजी विद्यार्थी वर्गात जाऊन बसले. त्या ठिकाणी लक्ष्मण कणसे सरांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. त्यानंतर सर्वजण पुन्हा एका शाळेच्या प्रागंणात कार्यक्रमासाठी हजर झाले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. यामध्ये सध्या कोण काय करतंय याबद्दल माहिती दिली. यापरिचयामधून त्यावेळचे आपले सहकारी कोणी डॉक्टर, कोणी इंजिनिअर तर कोणी मोठे व्यावसायिक झाल्याचे समजले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात साजिद सय्यद, संपदा शेळके -लावंड, संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या जुन्या आठवणी डोळ्या समोर उभ्या केल्या. तर उपस्थित सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचे डोळेही पानवल्याचे दिसून आलेे. आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींची 25 वर्षांनंतर भेट झाल्यामुळे हा दिवस सर्वांसाठी एखाद्या सणाहून कमी नसल्याचे यावेळी पहायला मिळाले. यावेळी मुलींनी शिक्षकांचे पाद्यपुजनही केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तोष्णीवाल, निर्मला इंगळे-तापकीर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी माजी विद्यार्थी प्रितम जगताप, जुबेर पठाण, विकास हांडे, बापु हांडे, मयूर गायकवाड, महेंद्र कांबळे दत्ता ताम्हाणे, वर्षा जगताप, झीनत शेख,  विजय यादव, प्रियंका शिंदे -भोसले, स्वप्ना खोले -नाझरे, जया होले, अमृता नाझरे, निलेश भोसले यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी सांभाळली. सायंकाळी चार वाजता पुन्हा भेटू या वाक्यावर कार्यक्रमाची सांगता झाली,  अन सर्वांचे पाय पुन्हा आपल्या वाटेकडे वळले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!