Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याबालेवाडी येथे राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा संपन्न

बालेवाडी येथे राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा संपन्न

पुणे, ,( पुणे 24 तास ब्युरो )

विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी व २१ व्या शतकातील कौशल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी येथे राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा १२ मार्च रोजी संपन्न झाली.

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, श्रीमती ज्योती शिंदे तसेच प्रशिक्षण परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प तयार करण्यासाठी आरोग्य, कृषी, वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरीविकास, स्वच्छता, अन्न आणि पोषण, परवडणारी व स्वच्छ उर्जा, लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा, प्रदूषण, डिजिटल सुरक्षा, संगणकीय विचार अशा १५ थीम्स देण्यात आल्या. या उपक्रमात ३६ जिल्हे, ८ हजार ९७८ शिक्षक,९ हजार २३ शाळा व १७ हजार ९५६ विद्यार्थी सहभागी झाले. राज्यस्तरावर एकूण ८८ शिक्षक व २६३ विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले.

प्रकल्पांच्या सादरीकरणाच्या परीक्षणानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा व खाजगी अनुदानित शाळा या गटातून प्रत्येकी ३ क्रमांकांची निवड करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्था : यवतमाळ जिल्ह्यातील सय्यद साहेबलाल शेख, प्रणाली प्रवीण मुटकुळे, संजीवनी प्रल्हाद मुटकुळे यांच्या बालसुरक्षा प्रकल्पाला प्रथम क्रमांक, सांगली जिल्ह्यातील सुनील आनंदा पाटील, श्रेया मारुती कुंभार, अंजली संभाजी साळुंखे यांच्या शाश्वत स्मार्ट इलेक्ट्रिक व सोलर वायरलेस चार्जिंग सिस्टीम या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक तर धाराशिव जिल्ह्यातील दिपाली सबसगी, वैष्णवी प्रशांत नवले, मानसी अविनाश गावकरे यांच्या भरडधान्यला तृतीय क्रमांक देण्यात आला.
शासकीय शाळा : सोलापूर जिल्ह्यातील शाम्बूसिंग बरोली, जमीर जमादार, जुबेद जमादार यांच्या बहुउपयोगी शेती यंत्रला प्रथम, यवतमाळ जिल्ह्यातील मंगेश सुरुषे, हर्षद शेले यांच्या शाश्वत पवन उर्जा प्रकल्पाला द्वितीय क्रमांक तर नागपूर जिल्ह्यातील पंकज कुणालराव तेरडे, संबोधी दुधे, श्रावणी वरुडे यांच्या ब्लूटूथ कनेक्टेड व्हीलचेअरला तृतीय क्रमांक देण्यात आला.

खाजगी अनुदानित शाळा : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सतीशकुमार कुर्ले, सार्थक कुर्ले, अथर्व फाटक यांच्या मासे विक्रेत्यांसाठी ट्रॉली- प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्ह्यातील युवराज पाटील, शुभश्री डाफळे, प्रियंका पाटील यांच्या सेफ्टी कँडलला द्वितीय व गडचिरोली जिल्ह्यातील एन. एम. वाईकर, खुशी बोदेले व वैष्णवी सुर्यवंशी यांच्या अन्नसुरक्षा डबा या प्रकल्पाला तृतीय क्रमांक देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!