Friday, August 28, 2026
spot_img
Homeउद्योगमहापारेषणच्या भूमिगत वीजवाहिनीत बिघाड

महापारेषणच्या भूमिगत वीजवाहिनीत बिघाड

माण, मारूंजी,

हिंजवडी फेज २ मध्ये भारनियमन टाळण्याचा प्रयत्न सुरु

पुणे,. (पुणे 24 तास ब्युरो )

 महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-हिंजवडी-१ अतिउच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. २८) रात्री ७ च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे सुमारे १०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली. भारव्यवस्थापनातून ही तूट भरून काढत महापारेषण व महावितरणकडून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र कमाल मागणीच्या काळात सुमारे ४० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर पुढील २४ तासांमध्ये हिंजवडी फेज-२, मेगापोलीस, माण व मारूंजी परिसरात चक्राकार पद्धतीने आवश्यकतेनुसार भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ते टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

       याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही पिरंगूट-हिंजवडी-१ अतिउच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये काल रात्री बिघाड झाला. महापारेषणच्या पाहणीमध्ये हिंजवडी येथे हा प्रकार घडल्याचे दिसून आले. मात्र बिघाडाचे कारण कळू शकले नाही. या वीजवाहिनीद्वारे १०० मेगावॅट विजेचे वहन केले जाते.  बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून पर्यायी वीजपुरवठाद्वारे भारव्यवस्थापन करून ही १०० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.

महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-हिंजवडी १ वीजवाहिनीद्वारे प्रामुख्याने हिंजवडी फेज दोन, मेगापोलीसमधील २०० आयटी उद्योगांसह माण व मारूंजी परिसरातील सुमारे १५ हजार ग्राहकांनी वीजपुरवठा केला जातो. या परिसरासाठी ४० मेगावॅट विजेची गरज आहे. तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे विजेच्या भारव्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे. यात कमाल मागणीच्या कालावधीत ४० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर हिंजवडी फेज दोन, मेगापोलीस, माण व मारूंजी परिसरात पुढील २४ तासांमध्ये आवश्यकतेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित उद्योग व वीजग्राहकांना समाज माध्यमे व मोबाईल एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे.

दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. २९) सकाळी सुरु करण्यात आले. यामध्ये खोदकाम करून वीजवाहिनीची पाहणी करण्यात येणार आहे व आवश्यकतेनुसार जाईंट देऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १२ ते २४ तासांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती देण्यात आली.

————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!