Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्या‘महापालिकेत आहोत, पण सुविधा नाहीत’—उंड्री–महादेववाडीतील दहा वर्षांची प्रतीक्षा

‘महापालिकेत आहोत, पण सुविधा नाहीत’—उंड्री–महादेववाडीतील दहा वर्षांची प्रतीक्षा

पुणे 24 तास:- “पिण्याचे पाणी आजही टँकरवर येते, पावसाळ्यात रस्ते चिखलात जातात आणि घरात कोणी आजारी पडलं, तर उपचारासाठी शहराच्या दुसऱ्या टोकाला जावं लागतं”—उंड्री–महादेववाडीतील ही व्यथा अनेक कुटुंबांचे वास्तव मांडणारी आहे. महापालिकेच्या हद्दीत येऊनही दहा वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या भागातील समस्या मार्गी लावण्यासाठी रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देत प्रशासनाकडून काम करून घेतले जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगरसेवक निवृत्ती बांदल यांनी दिली.

उंड्री–महादेववाडी (प्रभाग क्र.४१)चे नवनिर्वाचित नगरसेवक निवृत्ती बांदल यांनी ‘पुणे–२४ तास’शी संवाद साधताना परिसरातील रखडलेल्या विकासाकडे लक्ष वेधले. “सुमारे दहा वर्षांपूर्वी ही गावे महापालिकेत समाविष्ट झाली. मात्र, त्यानंतर निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासनाकडून अपेक्षित कामे झाली नाहीत. परिणामी नागरिक आजही मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

या परिसरात बंद नलिकेतून नियमित पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थेसाठी ड्रेनेज लाईन, सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते, आरोग्यासाठी महापालिकेचे रुग्णालय तसेच वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रस्ते रुंदीकरण ही तातडीची गरज असल्याचे बांदल यांनी स्पष्ट केले. “या समस्या केवळ आश्वासनांपुरत्या न ठेवता प्रत्यक्षात सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे आणि योगेश टिळेकर यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू करण्यात आला असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बांदल यांनी दिली.

“महापालिकेच्या हद्दीत राहूनही नागरिकांना पाणी, रस्ते आणि आरोग्यासाठी वणवण करावी लागणे, हे प्रशासनाचे अपयश आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरून काम करून घेणे, हाच माझा प्राधान्यक्रम असेल,” असे बांदल यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उंड्री–महादेववाडी परिसराला खऱ्या अर्थाने शहरातील सुविधा कधी मिळणार, हा प्रश्न आता नव्या नगरसेवकाच्या पाठपुराव्यावरच अवलंबून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!