Homeउद्योगमहाराष्ट्रात यंदा जोरदार पाऊस

महाराष्ट्रात यंदा जोरदार पाऊस

-जून ते सप्टेंबर मध्ये राज्यात अतिवृष्टी (105 ते 115 टक्के पाऊस )
-देशभरात 105 टक्के पावसाचा अंदाज (870 मी.मी)
-तामिळनाडू,पूर्वोेत्तर भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज
-हवामान विभागाचा मान्सून 2025 चा पहिला अंदाज जाहिर
-दुसरा अंदाज 15 ते 20 मे दरम्यान जाहिर करणार
-अल,निनो,आयओडी,स्नोफॉल स्थिती मान्सूनसाठी अनुकूल
पुणे ः(पुणे 24 तास ब्युरो )
महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची वार्ता भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी दिली आहे.यंदाचा मान्सून महाराष्ट्र अन छत्तीसगडवर मेहरबान राहणार असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात राज्यात अतिवृष्टी म्हणजे 105 ते 115 टक्के पाऊस बरसेल.तर देशभरात तो सामान्य पेक्षा जास्त म्हणजे 105 टक्के होईल अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.आर.रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी दिली..

मंगळवारी दिल्ली मुख्यालयातून पॉवर पॉईंट् सादरीकरणाद्वारे डॉ.रविचंद्रन आणि डॉ.महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.त्यांनी सांगितले की,तीन महत्वाच्या बाबी यंदाचा मान्सून चांगला बरसणार आहे हे सांगत आहेत.यात अल निनो,भारतीय समुद्री स्थिरांक आणि बर्फवृष्टी हे ते तीन निर्देशांक आहेत,ज्या आधारे हा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.संपूर्ण देशात यंदाचा मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालवाधीत समान्यपेक्षा जास्त म्हणजे 105 टक्के( सरासरी 870 मिलीमीटर) राहील.यात 1971 ते 2020 या 49 वर्षातील मान्सूनच्या डेटाद्वारे शास्त्रज्ञांनी कपल्ड मॉडेलचा अभ्यास करुन हा अंदाज दिला आहे.

महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाज..

डॉ.महापात्रा यांनी मान्सून कोणत्या राज्यात किती आणि कसा पडेल याचा अंदाज एका नकाशाद्वारे दिला.यात त्यांनी सांगितले की,देशभर मान्सून सामान्य पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 105 टक्के पडेल.तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यात मुसळधार (अबोव्ह नॉरमल) म्हणजे सुमारे 105 ते 115 टक्के इतका जास्त पडेल.त्यातही मराठवाड्यात यंदा त्याहीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.संपूर्ण नकाशात देशभरात निळा रंग दाखवलेला आहे.तर महाराष्ट्र आणि छत्तीसगड ही दोन राज्ये गडद निळ्या रंगात दाखवली आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टी..

डॉ.महापात्रा यांनी सांगितले की, महाराष्ट्र,छत्तीसगड,आंद्र प्रदेश ही तीन राज्ये गडद निळ्या रंगात दाखवली आहेत.त्यामुळे तेथे सामान्य पेक्षा जास्त पाऊस राहिलच पण मराठवाडा हा भाग अतिगडद निळा दाखवला आहे.म्हणजे तेथे अतिवृष्टीची शक्यता आहे.तेथे 115 मी.मी पेक्षाही जास्त पावसाचा अंदाज आहे.

अल निनो,आयओडी आणि बर्फवृष्टीचे संकेत…

डॉ.महापात्रा म्हणाले, अल निनो,भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) आणि हिमालयातील बर्फवृष्टी (स्नोफॉल) हे तीन महत्वाचे घटक मान्सूनसाठी जबाबदार असतात.यंदा अल निनो,आयडओडी हे जून ते सप्टेंबर पर्यंत तठस्थ राहणार आहेत.तर हिमालयात यंदा बर्फवृष्टी साधारण होती.ती बाबही चांगल्या मान्सूनसाठी सकारात्मक असते.बर्फवृष्टी जास्त झाली तर मान्सून कमजोर,कमी झाली तर चांगला मान्सून चांगला असे संकेत हवामानाच्या भाषेत मानले जातात.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
-मान्सून केरळात नेमका कधी येणार ययाचा अंदाज आता देता येणार नाही

  • 15 ते 20 मे दरम्यान मान्सूनचा स्पष्ट अंदाज येईल
  • तामीळनाडू आणि पूवोत्तर भारतात सामान्य पेक्षा कमी (94 ते 98 टक्के)पाऊस
  • गत पाच वर्षात 15 एप्रील रोजी दिलेले मान्सूनचे सर्व अंदाज खरे ठरल्याचा दावा
  • कोकण,मध्य,उत्तर महाराष्ट्र,विदर्भात मुसळधार तर मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता

– प्रशांत महासागर,हिंदी महासागरात भारतीय मान्सूनला अनुकूल स्थिती

(फोटोः मान्सून 2025 नावाच्या फोल्डर मध्ये सेव्ह)

नकाशा 1) फोटोओळः या नकाशात संपूर्ण भारतात मान्सून जून ते सप्टेंबर मध्ये कसा बरसेल ते दाखवले आहे.निळ्या रंगात सामान्य पेक्षा जास्त,गडद निळ्या रंगात अतिवृष्टी तर पिवळ्या रंगात सामान्य पेक्षा कमी पावसाची राज्ये दाखवली आहेत.यात महाराष्ट्र निळ्या रंगात त्यातही मराठवाडा गडद निळ्या रंगात दाखवला आहे.

2)नाकाशा 2 ःफोटोओळः या नकाशात अल निनो तठस्थ असल्याने तो भारतीय मान्सूनला कसा ़अनुकूल आहे ते दाखवले आहे
3) डॉ.आर.रविचंद्रन (सचिव,पृथ्वी विज्ञान मंत्रालय)

4) डॉ.मृत्युंजय महापात्रा (महासंचालक,भारतीय हवामान विभाग,दिल्ली)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!