Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगमहावितरणच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये

महावितरणच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये

पुणे परिमंडळ सलग तिसऱ्यादा अववल

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

: महावितरणच्या पुणे परिमंडल लघु प्रशिक्षण केंद्राने सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सलग तिसऱ्या वर्षीही राज्यातील प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. पुणे परिमंडलातील ६ हजार ८५८ अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गांसह विद्युत अभियांत्रिकीच्या ९ हजार ५०० विद्यार्थांसह १ लाख २६ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध एजन्सीजचे कर्मचारी व नागरिकांसाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

महावितरणच्या राज्यभरातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांतून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षांत पुणे लघु प्रशिक्षण केंद्राने तब्बल २८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. त्यानुसार नाशिक येथील महावितरणच्या मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या मानांकनात पुणे परिमंडलाचे लघु प्रशिक्षण केंद्र सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.

       पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांवर भर दिला आहे. यासाठी मुख्य महाव्यवस्थापक श्री. दत्तात्रेय बनसोडे (नाशिक) यांचेही महत्वाचे सहकार्य मिळाले. लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी गेल्या आर्थिक वर्षात १०५ प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. यात अभियंते, अधिकारी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, अप्रेंटीस, विविध एजन्सीचे कर्मचारी अशा ६ हजार ८५८ जणांना प्रामुख्याने सौर ऊर्जेसह विद्युत सुरक्षा, उपकेंद्र व वितरण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, अॅडव्हान्स मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर, सौर ऊर्जा, विद्युत वाहने, वीजचोरी रोखण्याच्या उपाययोजना, प्रथमोपचार, ताणतणाव व्यवस्थापन, वीजबिलांचे अचूक बिलींग आदींवर प्रशिक्षण देण्यात आले.

यासोबतच महावितरण व पुण्यातील ३३ विद्युत अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात ज्ञानाचे आदानप्रदान अंतर्गत सामंजस्य करार झाले आहेत. या विद्युत अभियांत्रिकीच्या ९ हजार ५०० विद्यार्थांशी थेट संवाद साधून वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, वीजसुरक्षा व डिजिटल ग्राहकसेवा आदींबाबत ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येत आहे. तसेच घरगुती व सार्वजनिक वीजसुरक्षा, डिजिटल ग्राहकसेवा, वीजबचत आदींबाबत शहरी व ग्रामीण भागात मेळावे, कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गांद्वारे सुमारे १ लाख २६ हजार नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतिमान करण्यासाठी विविध उपक्रमांना वेग देण्यात आला आहे. यासह कर्मचारी प्रशिक्षणाची व्याप्ती व वेग वाढवण्यात आला. त्याचा प्रशासकीय गतिमानता व तत्पर ग्राहकसेवेसाठी मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. पुणे परिमंडलाच्या लघु प्रशिक्षण केंद्रांने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम स्थान पटकावले याचे समाधान आहे’.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!