Homeक्रीडामहावितरण क्रीडा स्पर्धा; प्रसाद रेशमे, धनंजय औंढेकर यांच्या भागिदारीने क्रिकेट सामन्यात मुख्यालयविजयी

महावितरण क्रीडा स्पर्धा; प्रसाद रेशमे, धनंजय औंढेकर यांच्या भागिदारीने क्रिकेट सामन्यात मुख्यालयविजयी

भुजंग खंदारे यांचे तीन बळी; शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला सामना

बारामती (पुणे 24तास ब्युरो )

 महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेनिमित्त आयोजित क्रिकेटच्या प्रदर्शनीय सामन्यात कर्णधार संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे व कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी ३७ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबई मुख्यालय संघाने पुणे प्रादेशिक संघावर शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेत एक गडी राखून मात केली. पुणे प्रादेशिक संचालक व कर्णधार श्री. भुजंग खंदारे यांनी गोलंदाजीमध्ये अचूक मारा करीत तीन बळी मिळवत सामन्यात रंगत आणली. मात्र मुंबई मुख्यालयाच्या उर्वरित फलंदाजांनी सावध पवित्रा घेत संघाला विजय मिळवून दिला.

बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर शनिवारी (दि. ८) झालेल्या १६ षटकांच्या क्रिकेट सामन्यात पुणे प्रादेशिक संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली. यात कार्यकारी अभियंता श्री. संजय गायकवाड (२३ धावा) व सहायक महाव्यवस्थापक श्री. शशिकांत पाटील (१३ धावा) यांनी जोरदार सुरवात केली. त्यानंतर मुख्य अभियंता श्री. स्वप्निल काटकर व श्री. धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता श्री. विकास आल्हाट यांनीही धावसंख्येला आकार दिला. त्यामुळे पुणे प्रादेशिक संघाने १६ षटकांत ५ बाद ७८ धावा केल्या. यात मुख्यालय संघातील कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, दिनेश अग्रवाल, दत्तात्रेय पडळकर, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, कार्यकारी अभियंता सुनील पावरा यांनी अचूक गोलंदाजी करीत पुणे प्रादेशिक संघाला रोखण्यात यशस्वी झाले.

७९ धावांचे आव्हान स्विकारून मुंबई मुख्यालय संघाने फलंदाजी सुरु केली. मात्र शशिकांत पाटील यांच्या पहिल्याच षटकात एक फलंदाज शून्य धावसंख्येवर गमावला. कार्यकारी संचालक श्री. दिनेश अग्रवाल व सहायक महाव्यवस्थापक श्री. वैभव थोरात यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही सावधपणे धावसंख्या वाढवत असताना बाद झाले. त्यानंतर संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे (२१ धावा) व कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर (१९ धावा) यांनी डाव सावरला आणि चौफेर फटकेबाजी करीत ३७ धावांची भागीदारी केली.

ही भागीदारी वाढत असताना पुणे प्रादेशिक संघाचे कर्णधार भुजंग खंदारे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अचूक मारा सुरु केला. त्यांनी दोन षटकांत तीन फलंदाजांना बाद करीत सामन्याची रंगत वाढवली. मात्र गौरव खरे व हसीब खान यांनी सावध फलंदाजी करीत एकेरी, दुहेरी धावा केल्या. त्यामुळे मुख्यालय संघाची धावसंख्या ८ बाद ७२ झाली आणि शेवटच्या षटकात विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. शेवटचे षटक श्री. खंदारे यांनी सुरु केले. यात दुसऱ्याच चेंडूवर मुख्यालय संघाचा फलंदाज धावचित झाला आणि सामन्याच्या निकालाची आणखीनच उत्कंठा वाढली. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना सुमेध कोलते यांनी संघाला विजय मिळवून दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!