Homeताज्या बातम्यायशदाचे जलसाक्षरता केंद्राच्या जलजागृती सप्ताह कार्यक्रमाचा समारोप…..

यशदाचे जलसाक्षरता केंद्राच्या जलजागृती सप्ताह कार्यक्रमाचा समारोप…..

जलसंकट दूर करण्यासाठी राज आणि समाज यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक-डॉ.राजेंद्र सिंह

नद्यांमध्ये दुषित पाणी येता कामा नये-जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

नदी सुशोभीकरणा ऐवजी नदी पुनर्जीवन यावर भर दिला पाहिजे. नद्यांमध्ये पाण्याचा पर्यावरणीय प्रवाह येऊन त्या प्रवाहित राहिल्या पाहिजेत. नद्यांमध्ये दुषित पाणी येता कामा नये असे प्रतिपादन मॅगसेस पुरस्कार व स्टॉकहोम पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

महाराष्ट्र शासन आंगीकृत असलेल्या
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा)
जलसाक्षरता केंद्राचे वतीने
दि.१६ मार्च ते २२ मार्च जलजागृती सप्ताहा निमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन जलसंवाद कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात दि.२३ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता “शाश्वत विकास आणि जलसाक्षरता” या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ.राजेंद्र सिंह बोलत होते. यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे,जयाजी पाईकराव,लक्ष्मीकांत वाघावकर,इंजी. राजेश रिठे,भजनदास पवार, सुखदेव फुलारी, रविंद्र इंगोले, अंकुश नारायणकर,
यशवंत लोणकर, सचिन सूर्यवंशी,मनोहर सरोदे यांचेसह राज्यभरातील जलनायक, जलयोद्धा ,जलप्रेमी, जलदूत ऑनलाइन उपस्थित होते.

डॉ.राजेंद्र सिंह पुढे म्हणाले की,
जग,देश, राज्यावर आलेल्या जलसंकटावर उपाय समाजाला जलसाक्षर करणे हा जागतिक जलदिनाचा उद्देश आहे.
पाण्याचे प्रदूषण, भूजलाचे शोषण आणि अतिक्रमण यामुळे जलसंकट वाढत आहे.
अगोदर संवाद,संवादातून निष्कर्ष आणि निष्कर्षातून उपाय या तीन बाबी मधून जलसंकट दूर होऊ शकते. शाश्वत विकास आणि जलसाक्षरता एकमेकांवर अवलंबून आहे. जलसाक्षरता अखंड चालू राहिली पाहिजे. सर्व शासकीय विभागात उचित समन्वय आवश्यक. चांगले काम करणारे लोकांना एकत्र आणा, प्रोत्साहित करा.
गाव हे घटक (unit) आणि नदी ही व्यवस्था (system) मानून कार्यक्रम रुपरेषा आखा आणि जल यात्रांचे नियोजन करावे.
विविध जलविषयक कार्यशाळा , प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. प्रशिक्षण म्हणजे जलसाक्षरतेची सुरुवात आहे.परंतु कार्यक्षेत्रावर परिणाम देणारे (result oriented) काम दिसले पाहिजे.
जलनायक व इतर स्वयंप्रेरित फळींनी ही संपूर्ण झोकून देऊन काम करावे.
चला जाणूया नदीला , एक छान उपक्रम, स्तुत्य कार्य सुरु आहे,मात्र राज आणि समाज यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. यशदाचे जल साक्षरता केंद्राचे कार्य कौतुकास्पद आहे.जलनायक, जलयोद्धा ,जलप्रेमी, जलदूत यांची कुशलता वाढविण्याचे काम यशदा करत आहे,हे काम थांबू नये. प्रशिक्षित फळीने लोकसहभागातून गाव-तहसील पातळीवर एक तरी जल साक्षरतेचे मॉडेल तयार करावे आणि इतर लोकांना ही जलसाक्षर करावे. जलसाक्षरतेच्या कार्यात माझे नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन राहील.

या मान्यवरांचे लाभले मार्गदर्शन..

या ऑनलाइन जलसंवाद कार्यशाळेत
दि.१६ मार्च रोजी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पदमश्री पोपटराव पवार यांनी शाश्वत जलसमृध्द गाव- हिवरेबाजार,
दि.१७ मार्च रोजी जलयोद्धा गोवर्धन कुलकर्णी यांनी महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ पाणी वापर संस्था,

दि.१८ मार्च रोजी जलनायक रमाकांतबापु कुलकर्णी यांनी नपाण्याचा ताळेबंद- जलअंदाजपत्रक व पीक नियोजन आराखडा, दि.१९ मार्च रोजी जलनायक उदयसिंह गायकवाड यांनी चला जाणुया नदिला-नदी प्रदुषण समस्या व उपाय योजना, दि.२० मार्च रोजी भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा,पुणे उपसंचालक श्रीमती भाग्यश्री मग्गीरवार यांनी चला भूजल जाणुया-महाराष्ट्राची भूजल रचना व जलसाक्षरता, दि.२१ मार्च रोजी बालभारतीचे माजी संचालक कृष्ण कुमार पाटील यांनी जलसाक्षरतेमध्ये शालेय जलसाक्षरता महत्व व कृती कार्यक्रम तर दि.२२ मार्च रोजी पद्मश्री चैत्रराम पवार यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!