Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याराज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी

राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी

  • महसूल विभागाचा निर्णय
  • राज्यात लवकरच ८० अतिरिक्त जिल्हाधिकारी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

राज्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यातील ८० अधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांचा निर्णय धडाक्यातील हा महत्वपूर्ण निर्णय असून, गेली आठ नऊ वर्षं हा निर्णय रखडला होता. यामुळे राज्यातील महसूल विभागातील कार्यशैलीला प्रोत्साहन मिळणार आहे. सोमवारी हा शासन निर्णय जारी करण्यात आला.

  • अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याची संधी

उपजिल्हाधिकारी म्हणून १० वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी ) या पदावर नियमित सेवा देण्यात येते. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या वेतन संरचनेतही वाढ होते. या वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांतील काहींना अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याची संधी मिळते.महसूल सेवांमध्ये अनेक वर्षे पदोन्नती न झाल्याने साचलेपण आले होते. मात्र, या निर्णयामुळे आता महसूलच्या कामांना गती येणार आहे.

  • नऊ वर्षांपासून प्रतीक्षा

गेल्या आठ , नऊ वर्षांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणीवर पदोन्नती देण्याचा प्रस्ताव रखडला होता. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यातील काही प्रकरणात निकाल झाल्यानंतर हा प्रस्ताव महसूल विभागाच्या विचाराधीन होता.

  • वेतन संरचनेतही बदल होणार

उपजिल्हाधिकारी वरिष्ठ उपजिल्हाधिकारी झाल्याने त्यांच्या वेतन संरचनेतही बदल होणार आहे. काही प्रकरणात हा निर्णय न्यायालयाच्या अटीशर्तींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी निवडश्रेणी लागू करण्यात आली आहे.

पुढच्या काळात तहसिलदार ते उपजिल्हाधिकारी यांची पदोन्नती तसेच नव्याने उपजिल्हाधिकारी यांची पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याच्या दिशेने तयारी सुरू करण्यात आली आहे.

चौकट

  • महसूलमंत्र्यांचे धडाकेबाज निर्णय
    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाचा कार्य़भार स्वीकारल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सेवाज्येष्ठता सूची अंतिम करण्यात आली. १२५ उपजिल्हाधिकारी यांना निवडश्रेणी मिळाली, तसेच रखडलेली जिल्हा जात पडताळणी समितीची अध्यक्षपदेही भरण्यात आली आहेत.

” महसूल विभागाने १०० दिवसाच्या कामांचे उद्दिष्ट ठरविले असून, यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, वेतनवाढी व निवडश्रेणी या प्रशासनिक कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. यातील हा निर्णय आहे. या निर्णयामुळे शासन व जनता यामध्ये दुवा असलेली महसूल यंत्रणा अधिक लोकाभिमुख होणार असून आदर्श कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळेल.”

  • चंद्रशेखर बावनकुळे

महसूलमंत्री, महाराष्ट्र.

कृपया प्रसिद्धीसाठी:

  • रघुनाथ पांडे
    मुख्य माध्यम प्रमुख,
    मा. महसूल मंत्री, महाराष्ट्र
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!