Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यारेडी रेकनर दर ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

रेडी रेकनर दर ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

राज्य सरकारच्या महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी उपाय

पुणे (पुणे24 तास ब्युरो )

राज्य शासनाचे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी रेडी रेकनर दरात आठ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याबाबत महसूल विभाग गांभिर्याने विचार करीत आहे. लाडकी बहीण योजना, तसेच अन्य विविध विकास कामाचा वाढता बोजा लक्षात घेता, महायुती सरकारला आर्थिक आघाडीवर उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. मात्र, रेडीरेकनर दरात वाढ केल्यास, त्याचा थेट परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे.

राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत रेडी रेकनर दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे आता त्यात वाढ करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. जीएसटी, विक्री कर यानंतर तिसऱया क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातून मिळते. २०२२-२३ मध्ये ३२ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवले असताना, ४४ हजार ६८१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. दस्त नोंदणीतून गेल्या वर्षी २०२३-२४ मध्ये ५० हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवले होते. गतवर्षी दोन लाख ९० हजार १९१ दस्ताची नोंदणी झाली. त्याद्वारे राज्यसरकारला ५० हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले.  राज्य सरकारने या आर्थिक वर्षांत ५५ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवले आहे. गेल्या एप्रिलपासून आजपर्यंत दोन लाख दहा हजार दस्त नोंदले गेले असून, त्याद्वारे ४१ कोटी रुपये म्हणजे उद्दीष्ट्याच्या तुलनेत ७५ टक्के महसुली उत्पन्न मिळाले आहे.

महायुतीचे सरकार आता उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत असताना, गेल्या दोन वर्षांत रेडी रेकनर दरात वाढ न केल्याचे लक्षात घेत, आगामी आर्थिक वर्षांत तो वाढविण्यावर भर देईल, राज्याच्या वेगवेगळ्या भागातील गेल्या दोन वर्षांत झालेल्या खरेदी विक्रीची रक्कम विचारात घेत, वेगवेगळ्या भागात वाढीचे वेगवेगळे दर निश्‍चित करण्यात येतील, असे महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले. आठ ते पंधरा टक्केपर्यंत रेडी रेकनर दर वाढ अपेक्षित असून, त्याद्वारे महसुली उत्पन्नात पाच हजार कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.

पुणे, मुंबईपेक्षाही नांदेडमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्या भागातील अनेक नागरिकांनी गुजरातमधील प्रत्सावित असलेल्या डोलेरा या अद्ययावत शहरात जागा खरेदी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा अनेक बातम्यांची शहानिशा करीत नोंदणी आणि मुद्रांक विभाग वेगवेगळ्या भागातील रेडी रेकनर दर निश्‍चित करेल. त्याची अंमलबजावणी दरवर्षी एक एप्रिलपासून केली आहे. मात्र, त्यामुळे दस्त नोंदणी आणि सदनिकांची किमतीत वाढ होईल. त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.

……

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!