Sunday, October 18, 2026
spot_img
Homeआरोग्यवैद्यकीय आयोगाने डॉ. केळकर यांची मान्यता रद्द करावी

वैद्यकीय आयोगाने डॉ. केळकर यांची मान्यता रद्द करावी

  • दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण
  • विशाल विमल यांची मागणी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारामुळे गेल्या आठवड्यात एका तरुण महिलेचा प्रसुतीच्या दरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने आणि डॉक्टरने प्रसुतीसाठी ऍडमिट होताना सुमारे दहा लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली होती. मात्र सदर महिला, कुटुंबीय नातेवाईक यांनी दहा लाख रुपयांऐवजी तीन लाखांची तजवीज करून देखील त्यांना ऍडमिट करून घेतले नाही. त्यामुळे सदर महिलेला अन्य हॉस्पिटलमध्ये जावे लागले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सदर महिलेचा वेळ गेला आणि त्यामुळे सदर महिलेच्या प्रसुतीसंबंधी अनेक गुंतागुंतीच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर विविध क्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘रुग्णालयामध्ये ऍडमिट होताना रुग्णांनी भरून द्यावयाच्या फॉर्ममध्ये डिपॉझिट रक्कम डॉक्टरांनी लिहिण्याची पद्धत नाही. मात्र ती डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून लिहिली गेली. कारण राहू, केतू त्यांच्या डोक्यात आले म्हणून दहा लाख रुपये ते लिहून गेले, असा अशास्त्रीय खुलासा डॉ. धनंजय केळकर यांनी केला आहे.

कोणताही शास्त्रीय आणि व्यवहारिक आधार नसलेल्या ज्योतिषात राहू, केतू हे दोन ग्रह मानले आहेत. मात्र खगोलशास्त्रामध्ये राहू, केतूला ग्रह म्हणून मान्यता नाही. आणि खरे तर कोणतेही ग्रह हे पृथ्वीवरील मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत, हे शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट झालेले आहे. रुग्णालयाचे जबाबदार म्हणून डॉ. धनंजय केळकर यांनी केलेला दावा हा डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून माहिती घेऊनच केलेला असणार आहे. त्यामुळे विज्ञान शाखेचे असणारे डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांना ग्रहांसंबंधी शास्त्रीय माहिती नसणे हे अत्यंत धक्कादायक आहे. पूर्वपरंपार त्यांच्यावर असणारे संस्कार हे शिक्षणाने देखील गेलेले नाही, याचा त्यांच्या वक्तव्यातून पुरावा मिळतो. अंधश्रद्धाळू, कर्मकांडी आणि ब्राह्मण्यवादी प्रभाव डॉ. धनंजय केळकर यांच्यावर असल्याने त्यांनी राहू, केतू डोक्यात आल्याने दहा लाख रुपये डिपॉझिट रुग्णाने भरण्यासंबंधीची घटना घडल्याचे वक्तव्य केले आहे. स्वतःच्या चुकांची जबाबदारी झटकून त्या चुका राहू आणि केतूच्या माथी मारणे, यामागे चालूगिरी, कावेबाजपणा आणि धूर्तपणा आहे. भविष्यात एखाद्या रुग्णावर निदान, उपचार करत असताना रुग्णालय आणि डॉक्टरांकडून एखाद्या रुग्णावर विपरीत परिणाम झाले अथवा एखादा रुग्ण दगावला तर हे रुग्णालय आणि डॉक्टर हे सदर गोष्ट ही शनी, मंगळ अथवा राहू, केतूमुळे घडल्याचे सांगून हात वर करणार असल्याचे दिसते. आणि मग सदर चुकीसंबंधी न्यायालयाने नक्की शनी, मंगळ, राहू,केतूला शिक्षा ठोठावायची का ? असा प्रश्न पडतो.

एकूण वैद्यकशास्त्र हे कार्यकारणभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन या पद्धतीवर उभे आहे. आजारांचे निदान, उपचार, शस्त्रक्रिया, औषध निर्माण हे सर्व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पद्धतीने घडत असते. याचे सर्व शिक्षण डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांनी घेऊन देखील ते शास्त्रीय उपचार पद्धती विसरले की काय असा प्रश्न पडतो. डॉ. धनंजय केळकर यांनी केलेल्या बेकायदेशीर अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे समर्थन घडले आहे. उद्या वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील. त्यामुळे असा अशास्त्रीय दावा केल्याससंबंधी डॉ. धनंजय केळकर डॉ. सुश्रुत घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रद्द करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.

विशाल विमल
कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!