Homeताज्या बातम्या*शरद  पवार आणि अजित पवार ‘व्हीएसआय’च्या व्यासपीठावर एकत्र येणार

*शरद  पवार आणि अजित पवार ‘व्हीएसआय’च्या व्यासपीठावर एकत्र येणार

पुणे 🙁 पुणे 24 तास )
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची(व्हीएसआय) ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण सभारंभ येत्या गुरुवारी (२३ जानेवारी) होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहे. दरम्यान, वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासह अन्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्हीएसआयचे उपाध्यक्ष, विश्वस्त दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सभेमध्ये सभासद कारखान्यांना आणि विभागवार जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भूषण, राज्यस्तरीय ऊस भूषण, साखर कारखान्यातील आणि संस्थेमधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ण ऊस विकास आणि संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ण आसवनी, सर्वोत्कृष्ण पर्यावरण संवर्धन, नावीन्यपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कारखाना, सर्वोत्कृष्ण उद्योजक कारखाना यांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले.

सन २०२३-२४ वर्षामध्ये सर्वोत्कृष्ण ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण सहा शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी बद्दल एकूण १३ सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यंना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांना वैयक्तिक सात बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना पाच वैयक्तिक बक्षिसे यावेळी देण्यात येतील, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

चौकट १

अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना

कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार अहिल्यानगर येथील अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड, अंबिकारनगर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख ५१ हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला देण्यात येणार आहे. एक लाख रुपये  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चौकट २

अन्य पुरस्कार

सर्वोत्कृष्ट पर्यावरण सर्वधन पुरस्कार : दौड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (आलेगाव,ता.दौड, जि. पुणे )

– सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : सोमेश्वर साखर कारखाना (सोमेश्वरनगर, ता.बारामती,जि. पुणे )

– सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना (कागल, जि.कोल्हापूर)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!