Wednesday, October 14, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याशिवजयंती निमित्त २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन

शिवजयंती निमित्त २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, युवांच्या संकल्पना जाणून घेणे, कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, स्वच्छता, पर्यावरण याबाबत जागृकता, राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणा-या व्यक्तिमत्वाच्या कार्याचे आदर्श युवा पिढी पर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने शिवजयंती दिनी ” जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेचे सकाळी ९.३० वा. ते १२.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक वारसा जतन करणे यासाठी केंद्र शासनाच्या युवा कल्याण व खेळ मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवांचे मोलाचे योगदान आहे. युवांमध्ये नेतृत्व गुण, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक सेवा भाव, शासकीय उपक्रमांबाबत माहिती व सहयोग यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदयात्रेत युवा व क्रीडा पुरस्कारार्थी तसेच शहरातील सुमारे १५००० ते २०००० विद्यार्थी व युवा सहभागी होणार आहेत. या पदयात्रेला राज्याचे मुख्यमंत्री, नागरी विमान वाहतूक आणि सहकार केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण व अन्य मंत्री सहभागी होणार आहेत.

पदयात्रेचा सकाळी ९.३० वाजता सी.ओ.ई.पी तंत्रनिकेतेन विद्यापीठ, शिवाजीनगर पुणे येथील क्रीडांगणावरुन प्रारंभ करण्यात येणार आहे. पदयात्रेचा मार्ग सी.ओ.ई.पी. होस्टेल गाऊंड, शिवाजीनगर ते फर्ग्युसन महाविद्यालय असा राहील. सी.ओ.ई.पी. होस्टेल ग्राऊंड, डावीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून एआयएसएसपीएमएस कॉलेज, छ. शिवाजी महाराज पुतळा अभिवादन (हॉल्ट नं. १) उजवीकडे वळून कोर्टासमोरील गेटमधून उजवीकडे वळून छ. शिवाजी महाराज पुतळा चौक, उजवीकडे वळून स.गो. बर्वे चौक, डावीकडे वळून जंगली महाराज रोडने झाशीचीराणी चौक (हॉल्ट नं. २) छ. संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौक यु टर्न करून गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज गेट डावीकडे वळून फर्ग्युसन कॉलेज असा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाचे अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पदयात्रेमध्ये शहरातील युवा, युवतींनी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!