Homeताज्या बातम्यास्त्रीशक्ती हीच समाजाची खरी ताकद – प्रा. राजश्री भोसले

स्त्रीशक्ती हीच समाजाची खरी ताकद – प्रा. राजश्री भोसले

पुणे (पुणे 24 तास ब्युरो)

नाना पेठ येथील डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रा. राजश्री भोसले, प्राचार्य डॉ. प्रवीण कांबळे, उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे, माजी प्राचार्य डॉ. भारती सहस्रबुद्धे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. जयश्री कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली भागवत, निर्भय कन्या विभाग प्रमुख डॉ. अरुणा मुडावत, विद्यार्थिनी मंच विभाग प्रमुख डॉ. कोमल भोसले, प्रसिद्धी प्रमुख प्रा. रेखा मोरे,सहाय्यक परीक्षा विभाग व व्यक्तिमत्व विकास विभाग प्रमुख स्नेहा भोसले,यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत,जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे आणि खजिनदार सिद्धार्थ शेवाळे यांनी सहकार्य केले आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला सबलीकरण हा काळाची गरज –प्रमुख अतिथी प्रा.राजश्री भोसले यांनी आपल्या भाषणात स्त्रीशक्तीच्या महत्त्वावर भर दिला. त्या म्हणाल्या,”महिला दिन हा केवळ उत्सव नसून, महिलांच्या संघर्षाचा, यशाचा, हक्कांचा आणि सन्मानाचा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली जिद्द आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. शिक्षण, विज्ञान, व्यवसाय, कला किंवा सामाजिक कार्य – सर्वच क्षेत्रांत महिला अग्रेसर आहेत.”
त्यांनी महिलादिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत १८५७ साली न्यूयॉर्क येथे महिलांनी समान हक्क आणि वेतनासाठी केलेल्या आंदोलनापासून १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृत मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रवासाचे विवेचन केले. त्या पुढे म्हणाल्या,”महिला सशक्तीकरण म्हणजे महिलांना समान संधी, शिक्षण, रोजगार, सुरक्षा आणि निर्णयस्वातंत्र्य मिळणे. मात्र, अजूनही समाजात लिंगभेद आणि अन्याय कायम आहे. म्हणूनच महिला सबलीकरण हा आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाचा विषय आहे.”

स्त्री ही एक माता,पत्नी आणि मुलगीच नव्हे तर सक्षम व्यक्ती – डॉ.जयश्री कांबळे,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. जयश्री कांबळे यांनी सांगितले की, स्त्री ही केवळ एक नातेसंबंधांपुरती मर्यादित नाही, तर ती एक सक्षम व्यक्ती आहे. समाजातील प्रत्येकाने महिलांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे.

“स्वतःवर विश्वास ठेवा” – डॉ. भारती सहस्रबुद्धे,माजी प्राचार्य डॉ. भारती सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थिनींना संदेश दिला की,”शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करा, स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवा, स्वावलंबी बना आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ ही योजना केवळ घोषणा नसून समाजाची खरी गरज आहे.”

“एक शिक्षित स्त्री संपूर्ण कुटुंब आणि समाज घडवते” – स्नेहा भोसले
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. स्नेहा भोसले म्हणाल्या,”जागतिक महिला दिन केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नसून, महिलांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि सशक्तीकरणासाठी नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाने स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य केले पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कोमल भोसले यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.रूपाली भागवत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.अरुणा मुडावत यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!