Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यहडपसरमधील अमरधाम स्मशानभूमीमध्ये लिंगायत समाजाला जागा उलब्ध करून द्यावी

हडपसरमधील अमरधाम स्मशानभूमीमध्ये
लिंगायत समाजाला जागा उलब्ध करून द्यावी

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

हडपसर पंचक्रोशीमध्ये १० हजारहून अधिक लिंगायत समाज आहे. हडपसर माळवाडी येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये जागा अपुरी पडत आहे. मागिल अनेक वर्षांत पालिका प्रशासनाकडून फक्त माती टाकल्याने उंचवटा झाला आहे. सध्या दफन करण्यासाठी खड्डा घेतल्यावर त्यामध्ये मृत शरीरातील हाडे सापडतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने लिंगायत समाजाला दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वीरशैव लिंगायत मंडळाचे अध्यक्ष रवींद्र लाटनेकर यांनी केली आहे.

लाटनेकर म्हणाले की, हडपसर अमरधान स्मशानभूमीमध्ये असलेली जागा कमी पडत आहे. त्यामुळे दफन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या उपलब्ध स्मशानभूमीमध्ये गवत उगवले आहे. पावसाळ्यात चिखलमाती, गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव असतो. दफन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी जागा अपुरी आहे. येथील जागा समतल नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दफन करण्यासाठी खद्दा खोदला, तर त्यामध्ये हाडं दिसून येतात. नवीन खड्डा कोठे खोदायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी दै. पुण्यनगरीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, दफन भूमीच्या जागेत खासगी वखार व्यावसायिकाने पालिकेच्या जागेत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी गुरुनाथ हडदरे, धंनजय लंगोटे, राजेंद्र कानडे, सुरेश हडदरे यांनी केली आहे.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील म्हणाले की, लिंगायत समाजाला हडपसरमधील अमरधान स्मशानभूमीमध्ये जागा कमी पडत असल्याची तक्रार आली आहे. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाशी बोलून लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!