पुणे : पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशन परिसरात रविवारी पहाटे कारच्या अपघातात दोन जण ठार तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.यश प्रसाद भंडारी (२३, रा. पिंपरी-चिंचवड) आणि ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३, रा. पुण्यातील पिंपरीगाव) अशी मृतांची नावे आहेत.पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 5.30 च्या सुमारास कार बंड गार्डन मार्गावरून जात असताना ही घटना घडली.जखमी प्रवासी खुशवंत टेकवानी यांना गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्राथमिक तपासात टेकवानी हा बीड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















