-संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणणार
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र,नुकताच घडलेला प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले. दरम्यान संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी महसूल विभागने राज्यातील अधिका-यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आले होते. त्यावेळी पत्रकांराशी ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,“ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल. ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला मला आनंद आहे, जोपर्यंत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत याप्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पण शो बाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरु आहे. या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्याने काही अधिकार देण्यात आले आहेत. भविष्यात त्यादृष्टीने कायद्यात बदल केला जाईल. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. रुग्णालयात किती बेड आहेत, ते दिले जात आहेत की नाही, हे सगळं कळण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























