Homeताज्या बातम्याएच.एन.डी. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात ऐतिहासिक विजय! धर्मदाय आयुक्तांचा आदेश — विक्री...

एच.एन.डी. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात ऐतिहासिक विजय! धर्मदाय आयुक्तांचा आदेश — विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे!

पुणे २४ तास ता. ३० ऑक्टोंबर २०२५:-(संपादक) मोहिनी मोहिते

एच.एन.डी. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात ऐतिहासिक विजय! धर्मदाय आयुक्तांचा आदेश — विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे!

पुण्यातील सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (एच.एन.डी. जैन बोर्डिंग) या ऐतिहासिक संस्थेच्या भूमी विक्री प्रकरणात अखेर न्याय मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोति यांनी आज (३० ऑक्टोबर २०२५) दिलेल्या आदेशाद्वारे ४ एप्रिल २०२५ रोजी दिलेला विक्री मंजुरी आदेश रद्द केला असून, विक्रीखत व पावर ऑफ अटर्नी रद्द करून मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे परत आणण्याचे निर्देश दिले आहेत.

या आदेशानुसार, “गोखले लँडमार्क्स एलएलपी” या डेव्हलपर फर्मशी झालेला व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात आला असून, ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम (टीडीएस वगळून) परत करणे बंधनकारक केले आहे.

तसेच संबंधित मालमत्ता ट्रस्टच्या नावावर परत नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लढ्याची पार्श्वभूमी:

ही लढाई गेल्या पाच महिन्यांपासून सुरु होती.

विद्यार्थ्यांसाठी आणि जैन समाजासाठी उभारलेली ही ऐतिहासिक संस्था काही लोकांनी गैरमार्गाने बिल्डरला विकल्याचा प्रकार समोर आला, आणि या गैरव्यवहाराचा मुद्दा सर्वप्रथम अक्षय जैन, आनंद कांकरिया, स्वप्निल गंगवाल, महावीर चौगुले यांनी सुरुवातीपासून पुरावे गोळा करणे, दस्तऐवज गोळा केले.

आचार्य गुरुदेव गुप्तिनंदी जी महाराज यांच्या मार्गदर्शनात, या लढ्यात ॲड. योगेश पांडे, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, सुकौशल जिंतूरकर, यांनी कायदेशीर बाजू सांभाळली आणि सुनावणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

⚖️ आदेशातील मुख्य मुद्दे:

1. ट्रस्टला दिलेली विक्री मंजुरी (Order Dated 04-04-2025) रद्द.

2. ८ ऑक्टोबर २०२५ रोजीची विक्रीखत आणि पावर ऑफ अटर्नी रद्द करण्याचे आदेश.

3. ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम (Less TDS) परत करणे बंधनकारक.

4. मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या नावावर नोंदविण्याचे निर्देश.

5. दोन्ही अर्ज (CC/08/2025 व CC/50/2025) निकाली काढण्यात आले.

अक्षय जैन, सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस, जैन हॉस्टेल बचाव समिती म्हणाले: “ही केवळ एका मालमत्तेची जैन समाजाची लढाई नव्हती — ती विद्यार्थ्यांच्या हक्कांची, समाजाच्या श्रद्धेची आणि न्यायाच्या तत्त्वांची सामाजिक लढाई होती. लढाईमुळे सोपी नव्हती, बऱ्याच अडचणी आल्यात.

समाजातील सर्वच घटकांचा आम्हाला पाठिंबा मिळालेला, सर्व जाती, धर्म, पक्ष राजकारणी यांचा यात प्रामुख्याने सहभाग होता. हा निर्णय केवळ एका ट्रस्टपुरता मर्यादित नाही,

तर धर्मदाय कायद्यांतर्गत सर्व संस्थांसाठी पारदर्शकतेचा आणि न्यायाचा आदर्श निर्माण करणारा आहे.

हे एक लँडमार्क निर्णयभ विष्यासाठी ठरलेला आहे.

तत्काळ हॉस्टेल सुरू करणं हे आमचं उद्येश आहे.

लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, जैन समाज अहिंसेच्या मार्गाने चालत आलेले आहे, हा सुरू झालेला या लढ्याला 100% आता यश आलेला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जैन समाजाला दिलेला शब्द हा तंतोतंत 100% पाळला याचा आम्हा सर्व जैन बांधवांना मनापासून चा आनंद आहे.

नामदार अजितदादा पवार, नामदार एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ माजी खासदार राजू शेट्टी, माजी आ. रवींद्र धांगेकर, अभय छाजेड आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार.

ऍड योगेश पांडे म्हणाले सर्व कायदेशीर बाबी तपासून, दिवस-रात्र एक करून हा लढा आम्ही ताकतीने जिंकलो आणि यापुढेही सुरू राहील. सोपं नव्हतं, हायकोर्ट, धर्मादाय आयुक्त ज्या ज्या संस्था यात होत्या तिथे सर्व ठिकाणी लढायचं निश्चित केलेलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!