Homeताज्या बातम्याजैन समाजाच्या भावनांना न्याय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार : चंद्रकांतदादा पाटील

जैन समाजाच्या भावनांना न्याय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार : चंद्रकांतदादा पाटील

जैन समाजाच्या भावनांना न्याय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार : चंद्रकांतदादा पाटील

पुणे २४ तास:- ( संपादक) मोहिनी मोहिते

गेला महिनाभर सुरू असलेल्या पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या हॉस्टेल संदर्भातील व्यवहार रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांनी आज ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिला. ‘हा मुद्दा जैन समाज आणि संबंधित विकसक यांच्यातील असून या प्रकरणात जैन समाजाच्या भावनांना न्याय दिला जाईल,’ अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. विकसकाने व्यवहार रद्द करण्यासाठी केलेला अर्ज, त्यानंतर ट्रस्टने व्यवहारातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाला दिलेली ग्वाही या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांनी सामाजिक सलोखा जपणारी भूमिका घेत शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि विकसक यांच्या परस्परमान्यतेने व्यवहार पूर्णतः रद्द करण्याचे आदेश दिले. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या व्यवहारापोटी ट्रस्टला अदा केलेली रक्कम विकसकास परत देण्याचे स्पष्ट निर्देशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.

या विषयात पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि माझे मित्र मुरलीधर मोहोळ यांचे नाव विनाकारण ओढले गेले. भारतीय जनता पक्षाची दिवसागणिक वाढत असलेली ताकद हा अनेक नतद्रष्टांसाठी असूयेचा विषय आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. निवडणूक जवळ आली की या प्रयत्नांना जोर येतो. मुरलीधर मोहोळ यांच्या बदनामीचा प्रयत्न हा या असूयेचाच भाग होता. या प्रकरणात आरोपांची राळ उठवणाऱ्यांच्या पूर्वेइतिहासावर नजर टाकली तर त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना सहज समजू शकेल.

या प्रकरणात विविध आरोप व टीका होत असतानाही जैन समाजासाठी अत्यंत शांत, संयमी आणि संतुलित भूमिका घेतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मी विशेष अभिनंदन करतो. या निर्णयामुळे जैन समाजाच्या मागणीला योग्य तो न्याय मिळाला असून, जैन मुनींचाही सन्मानपूर्वक आदर केला गेला आहे. या विषयी जैन समाजाने घेतलेल्या सामजंस्यपूर्वक भूमिकेबद्दल त्यांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.

भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळणारा जनतेचा कौल हा प्रत्येक समाजघटकाचा विश्वास कमावण्यातून मिळालेला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी पक्ष, नेते आणि कार्यकर्ते सातत्याने घेत असतात. हा विश्वास पुन्हा एकदा देवेंद्रजींनी सार्थ ठरवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात विनाकारण सुरू असलेली चिखलफेक थांबवावी आणि पुण्यातले वातावरण आणखी गढूळ करू नये, अशी अपेक्षा मी यानिमित्ताने करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!