Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक

पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी राजधानी दिल्ली सह देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केले. हे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचे कुकर्म देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विद्यार्थ्यांवर लाठ्या, टिअर गॅस, पॅलेट गन्स तर काही ठिकाणी अगदी AK47 सारखी दहशतवाद्यांच्या विरोधात वापरली जाणारी शस्त्रे विद्यार्थ्यांवर वापरण्यात आली. अमित शहांच्या या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले, अनेकांची दृष्टी केली, अनेकांची श्रवण शक्ती केली, अनेक विद्यार्थी कायमचे अधू झाले. या पोलीस हल्ल्यात अनेक विद्यार्थिनींचा, महिलांचा विनयभंग झाला. देशातील तरुणाईला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणारे गृहमंत्री अमित शहा 1 ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य टिळक पुरस्कारांच्या निमित्ताने पुणे शहरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर (पूर्व) काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

अगदी आंदोलन संपल्यानंतरही सरकारने दिलेले वचन मोडून आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास, त्यांची धरपकड करण्यास, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना छळण्यास सुरुवात केली आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी, सकाळी 10.30 वाजता अमित शहा यांच्या नियोजित प्रवास मार्गावर सेव्हन लव्हज चौक, शंकरशेठ रोड, पुणे येथे अमित शहांचा निषेध करण्यासाठी पुणेकरांनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने जमावे असे आवाहन प्रशांत जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून तमाम पुणेकर मोदी सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा, विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याचा निषेध नोंदवतील अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!