पुणे 24 तास:- संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला मातंग एकता आंदोलन व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्यावतीने महात्मा फुले स्मारक फुले वाडा येथून संविधान संरक्षण जनजागरण फेरीचे आयोजन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या संविधान फेरीमध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे इंदिरा अविनाश बागवे, शहर अध्यक्ष विठ्ठल थोरात , अँड. राजश्री अडसूळ, सुरेखा खंडाळे, जुबेर दिल्लीवाला, सादिक लुकडे, चेतन अग्रवाल, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, विलास कांबळे, डॉ. रमाकांत साठे, रवी पाटोळे, यासेर बागवे, प्रा. वाल्मीक जगताप व संघटनेचे शहराचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. या फेरीचे समारोप सभा जुना मोटर स्टँड भवानी पेठ येथे संपन्न झाली यावेळी रमेश बागवे, मोहन जोशी, अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, चेतन अग्रवाल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यागातून अविरत परिश्रम घेऊन आपल्या देशाला संविधान निर्माण करून दिले. आज तेच संविधान व लोकशाही धोक्यात असून संविधानामध्ये काही राजकारणी दिवसेंदिवस सत्तेच्या जोरावर बदल करीत आहे. आपण सर्वानी संविधानाचे रक्षण करणे काळाची गरज आहे यामुळे भविष्यात आपणास फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आज संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वानी शप्पथ घेतली पाहिजे, जो पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी संविधानाच्या संरक्षणाकरिता सक्षम आहेत तो पर्यंत संविधानाला कोणास हातलाऊ देणार नाही, असे परखड मत रमेश बागवे यांनी व्यक्त केले. शेवटी सर्व उपस्थितांनी संविधानाची शप्पथ घेऊन अभिवादन केले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























