पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
शिवसेना पक्ष प्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त वडगावशेरी सुनिता नगर, द्वारका गार्डन जवळ युवासेना शाखेच्या नवीन नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
याफलकाचे उद्घाटन युवासेना शहरप्रमुख सनी गवते, शिवसेना शहर समन्वयक सतीशआप्पा मुळीक, दिलीप देवकर पाटील उद्योजक, विनोद पऱ्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सतीशआप्पा मुळीक सनी गवते यांनी कार्यकर्त्यानां भविष्यातील वाटचालीसह पक्षवाढीसाठी मार्गदर्शन केले
यावेळी कार्यकर्त्यांनी देखील पूर्वीप्रमाणेच पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी निष्ठेने सर्वस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमास परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेना उपशहरप्रमुख शिवप्रसाद जठार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रसंगी युवासेना विधानसभा प्रमुख सोनू पाटील, सुरेश अल्हाट, सचिन पगारिया, आदिनाथ फडतरे, राकेश कांबळे, राहुल शेंडगे,अंकित आहीर, किशोर अहिरराव, रोहन भांडे, अनिल जाधव, रवी रेमजी, सौरभ बापट, विवेक वाडेकर, शुभम वंजारे, सलमान शेख, अभिनंदन वाघमारे, योगेश चाकोरे, आकाश आडेप, मंदार कदम, आमिर शेख, उमेश मोझे, महेश जगताप आदी पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























