श्री शिवाजी विद्यालयामध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आता काळाची गरज आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेबरोबर इतरही भाषा अवगत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कष्टकरी, कामगारांची मुले शिकली पाहिजेत, त्यांच्या अडचणी समजून घेत ज्ञानदानाचे कार्य महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे मत अध्यक्षा स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले विद्या निकेतन संचलित दत्तनगर (आंबेगाव) येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ, उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब चव्हाण, माजी नगरसेविका स्मिता कोंढरे, शंकरराव बेलदरे, बापूसाहेब चव्हाण, माजी सरपंच एकनाथराव बेलदरे पाटील, जीवन विद्या मिशनचे मेमाने, माजी विद्यार्थी कॉन्ट्रॅक्टर प्रमोद कामठे, आनंदा पाटील उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये नृत्य, वक्तृत्व, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
समीर गायकवाड व गौतम बामणे यांनी सूत्रसंचालन केले. मंगल जाधव यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























