Saturday, August 22, 2026
spot_img
Homeक्राईम‘शून्य’ रुपयांच्या ‘विश्वासावर’ तब्बल ३०० कोटींचा व्यवहार

‘शून्य’ रुपयांच्या ‘विश्वासावर’ तब्बल ३०० कोटींचा व्यवहार

पुणे 24 तास : मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात करण्यात आलेल्या खरेदी खतातून विश्वासाचा अजब नमुना दिसून आला आहे. कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी ३०० कोटींच्या या जमिनीच्या व्यवहारापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राईजेसकडून एकही कृपया न घेता थेट खरेदीखत केले आहे. ही तीनशे कोटींची रक्कम कशी व केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख या खरेदीखतात केलेला नाही, हे विशेष. सामान्यांच्या खरेदीखतावेळी मात्र, किती पैसे दिले, कसे देणार आहात, खरेदीखतापूर्वी साठेखत करूया, त्यानंतर पूर्ण रक्कम मिळाली की खरेदीखत करू, अशा नाना स्वरूपाच्या कार्यवाहीला विक्री करणारा तसेच वकील आणि दुय्यम निबंधक देखील आग्रह धरत असतो. या व्यवहारात मात्र असा कोणताही ‘अर्थपूर्ण’ आग्रह धरण्यात आलेला नाही.

    Oplus_16908288

सध्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेली मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या खरेदीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या गैरव्यवहारामुळे गेले दोन दिवस राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. चौफेर टीका झाल्यानंतर अखेर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. पार्थ पवार यांनी नेमका काय व्यवहार केला, हे आपल्याला माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या व्यवहारात एकाही रुपयाची देवाणघेवाण झाली नसल्याचेही स्पष्ट केले.

कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांच्यात झालेल्या खरेदीखतात याचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनीची प्रत्यक्षात किंमत सुमारे १८०० कोटी रुपये सांगितली जात आहे. मात्र, खरेदीखत करताना या जमिनीचे मूल्य २९४ कोटी रुपये इतके दाखविण्यात आले. तर व्यवहार करताना ३०० कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे खरेदी खतावरून दिसून येत आहे.

कोणताही व्यवहार करताना खरेदीदार काही ठराविक रक्कम विक्री करणाऱ्याला देत असतो. उर्वरित रक्कम किती आणि केव्हा दिली जाईल, याचा उल्लेख साठेखतात केला जातो. संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतर पुन्हा खरेदीखत केले जाते. हे करत असताना अशा व्यवहारांमध्ये बँकेकडून कर्ज घ्यावयाचे असल्यास रक्कम किती व कशा स्वरूपात दिली आहे, कधीपर्यंत दिली जाणार याची इत्यंभूत माहिती द्यावी लागते. याबाबत बँका आग्रही असतात. तसेच वकीलही अशा स्वरूपाच्या उल्लेखाचा आग्रह धरतात. दस्ताचा मसुदा तपासण्यापूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनही याबाबत विचारणा केली जाते. त्यामुळे सामान्य नागरिक अशा स्वरूपाचा व्यवहार करताना सजग असल्याचे दिसून येते.

——–

मात्र, या तीनशे कोटी रुपयांच्या एवढ्या मोठ्या व्यवहारात खरेदीदाराकडून एक रुपयाही देण्यात आला नाही. तरीदेखील कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांनी या व्यवहारात साठेखत न करता थेट खरेदीखत केले. त्यातही ही तीनशे कोटी रुपये रक्कम खरेदीदाराकडून मिळेल एवढेच एवढाच उल्लेख त्यात करण्यात आला. मात्र, ही रक्कम केव्हा मिळेल कशी मिळेल याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. अर्थात ‘शून्य’ रुपयांच्या ‘विश्वासावर’ हा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण करण्यात आला आणि त्याचे खरेदीखतही पूर्ण झाले. त्यामुळे या व्यवहारातून ‘विश्वासाचा’ अजब नमुना सामान्यांपुढे प्रस्तुत करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे व्यवहार झाल्यास विश्वासाचे अनेक पायंडे रचले जातील असे जाणकार वकिलांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!