Homeताज्या बातम्याप्रभावी राजकीय प्रतिनिधित्वासाठी जैन युवकांनी एकत्र येणे ही काळाची गरज” — परमपूज्य...

प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वासाठी जैन युवकांनी एकत्र येणे ही काळाची गरज” — परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज

पुणे 24 तास:- पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचे संघटित आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने “पुणे सकल जैन समाज मेळावा” उत्साहात पार पडला. मेळाव्यास दीड हजार हून अधिक जैन अनुयायांनी हजेरी लावली.

हा मेळावा उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ यांच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात जैन समाजातील विविध संघटना, संस्था, ट्रस्टचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजाच्या राजकीय सहभागाची दिशा, एकजूट आणि आगामी निवडणुकांमधील जैन समाजाचा प्रभावी सहभाग या विषयांवर सखोल चर्चा झाली.

“जैन समाजाची संघटित शक्ती आणि युवकांचा सक्रिय राजकीय सहभाग हे समाजाच्या सशक्त भविष्यासाठी अत्यावश्यक आहे तसेच धर्मापेक्षा पक्ष मोठा नाही, जैन समाजातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पण सर्वांनी प्रयत्न करूया असल्याचे मत आयोजक आदिनाथ स्थानकवासी जैन ट्रस्ट चे अध्यक्ष अनिल नहार, जैन अल्पसंख्यांक महासंघ चे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी आणि प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथ्था यांनी व्यक्त केले.

यासा कार्यक्रमात माजी मंत्री राजेंद्र बाबू दर्डा, विजय भंडारी, अभय छाजेड, अनिल नहार, इंदर छाजेड, सुनील लोढा, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब ओसवाल, प्रविण चोरबोले, राजेंद्र बाटीया, हरेश शहा, प्रशांत देसरडा यांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यादरम्यान विविध राजकीय पक्षांतील जैन समाजातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली
भारतीय जनता पक्ष: महेंद्र सुंदेचा मुथा, प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, आनंद छाजेड, भरत भुरट, विपेश सोनीग्रा, अरविंद कोठारी, प्रतीक देसरडा, राजू बाफना, कुंतीलाल चोरडिया, श्रीमल बेदमुथा, प्रकाश बाफना, प्रीती पाटील
काँग्रेस: भरत सुराणा, आनंद बाफना, योगिता सुराणा, अरुण कटारिया
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): निलेश शहा, प्रशांत गांधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): जया बोरा, सुवर्ण कोठारी शिवसेना, (एकनाथ शिंदे गट): रिषभ नानावटी
मनसे: ऋषभ सिंगवी, अपक्ष: निखिल मुनोत, हर्षदा मुनोत
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश बोरा, मयूर सरनोत, जिनेन्द्र कावेडिया, विनोद सोळंकी, अभिजीत शहा, सौरभ धोका, निमेश शहा, सागर लुनिया, ऋषिकेश शहा, संतोष बोरा, आनंद गादिया, पंकज बाफना यांनी परिश्रम घेतले.

प्रस्ताविक व सूत्रसंचालन संदीप भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र सुंदेचा मु मुथ्था यांनी केले.
कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य दिल्याबद्दल आदिनाथ स्थानकवासी जैन ट्रस्टचे विशेष आभार मानण्यात आले.

मेळाव्यातील वातावरण जैन समाजाच्या एकतेचा, संघटित शक्तीचा आणि आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व घडविण्याच्या दृढ निर्धाराचा साक्षीदार ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!