Tuesday, August 18, 2026
spot_img
HomeMSEDCLथकबाकीमुक्त व अपघातशून्य महावितरण' हीच प्राथमिकता - संचालक राजेंद्र पवार

थकबाकीमुक्त व अपघातशून्य महावितरण’ हीच प्राथमिकता – संचालक राजेंद्र पवार

महावितरणमधील पहिल्या ‘वूडन बॅडमिंटन कोर्ट’चे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे, १३ फेब्रुवारी

महावितरण कंपनीने आपल्याला समाजात मान-सन्मान आणि ओळख दिली आहे. आता आपणही कंपनीला उत्तम योगदान देण्याची वेळ आली आहे. जागतिक दर्जाची उत्कृष्ट ग्राहकसेवा, थकबाकीमुक्ती आणि सुरक्षिततेचे नियम पाळून ‘अपघातशून्य महावितरण’ घडवणे हीच आपली प्राथमिकता आहे. असायला हवी,” असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी गुरुवारी (दि. १२) केले.

राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार व्हावेत या हेतूने पुण्यातील रास्तापेठ प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महावितरणमधील पहिले ‘वुडन बॅडमिंटन कोर्ट’ साकारण्यात आले आहे. पुणे येथे मुख्य अभियंता असताना श्री. राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेनुसार कोर्टचे काम सुरू झाले होते. या कोर्टचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. राजेंद्र पवार बोलत होते.

यावेळी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य अभियंता सुनिल काकडे, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, उपमहाव्यवस्थापक अभय चौधरी, डॉ. संतोष पाटणी यांचेसह परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, ‘समाजात आपल्याला मिळणारा मान-सन्मान हा कंपनीमुळेच आहे. त्यामुळे आपली प्राथमिकता कायम महावितरण असले पाहिजे. कर्मचारी कल्याणासाठी लागणाऱ्या बाबी पुरविण्याकरिता महावितरणचे वरिष्ठ प्रशासन कायम सकारात्मक आहे. कितीही स्पर्धा झाली तरी आपला ग्राहक टिकून राहील यासाठी ग्राहकसेवा सुधारण्यावर भर द्या.’

प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे म्हणाले, मी सुद्धा एक खेळाडू आहे. अशा प्रकारचे सुसज्य असे ‘वुडन कोर्ट’ उपलब्ध होणे ही पर्वणीच आहे. खेळाडुंनी त्याचे चीज करावे. त्याचे पावित्र्य राखावे. नियम पाळावेत, स्वच्छता ठेवावी. तर मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले, कंपनीच्या क्रीडा स्पर्धांत पुणे परिमंडलाचे खेळाडू सरस ठरले आहेत. खेळांमुळेच कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण होते. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा तत्परतेने पुरविण्यावर मी भर देत आहे.

सूत्रसंचालन भक्ती कुलकर्णी व प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांनी केले. तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय सुळे यांनी आभार मानले. याप्रसंगी बॅडमिंटनपटू भरत वशिष्ट, सुरेश जाधव यांचेसह अजय जाधव, संगिता देशमुख व कुस्तीपटू दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

महावितरणचे क्रीडा धोरण लवकरच

महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात. राष्ट्रीय पातळीवरही महावितरणचे अनेक खेळाडू चमकत आहे. त्यांच्या सेवा-सुविधा वाढविणे व प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी स्वत:चे क्रीडा धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले.

राज्यात महावितरणचे पहिलेच ‘बॅडमिंटन कोर्ट’

बॅडमिंटन तसा महागडा खेळ आहे. व्यावसायिक कोर्टवर सराव करायचा झाल्यास तासाला पैसे मोजावे लागतात. तसेच ते आपल्या वेळेत उपलब्ध होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन श्री. पवार यांनी महावितरणचे हक्काचे ‘वुडन बॅडमिंटन कोर्ट’ साकारण्याचा निर्णय घेतला. लवकरच या कोर्टवर मॅट टाकण्याचेही काम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

error: Content is protected !!