Thursday, October 15, 2026
spot_img
Homeदेश-विदेशशीतल तेजवानी समक्ष हजर राहणार का?

शीतल तेजवानी समक्ष हजर राहणार का?

पुणे २४ तास:-  मुंढवा येथील शासकीय जमिनी खरेदीचा झालेला व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया एंटरप्रायझेस कंपनी दाखविली असली, तरी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. या व्यवहाराचा दस्त रद्द (कॅन्सल डिड) करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे अशा दोघांना समक्ष हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी या प्रकरणातील शीतल तेजवानी समक्ष हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंढवा येथील शासनाच्या मालकीची ४० एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेसने तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. हा व्यवहार ‘अमेडिया’चे भागीदार दिग्विजयसिंह पाटील व कुमखत्यारधारक शीतल तेजवानी यांच्यामध्ये झाला आहे. या खरेदीखतावेळी (दस्त नोंदणी) या कंपनीने जागेवर डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा उद्योग केंद्राकडून मुद्रांक शुल्कात माफी घेण्यात आली. तर दुय्यम निबंधकांनी देखील दस्तांवरील पाच टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याऐवजी सात टक्के शुल्क माफी दिली आहे. शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हा व्यवहार घेता करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी शासकीय जमिनींचा अपहार झाल्यामुळे शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर हे खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय कंपनीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीच्या लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनही चौकशी केली होती. परंतु हा दस्त रद्द करण्यासाठी कॅन्सल डिड करावे लागणार आहे. त्यासाठी ज्या दोघांमध्ये हा व्यवहार झाला आहे. त्या दोघांनाही हजर राहून तो रद्द करावा लागणार आहे. तसेच त्यापोटी ४२ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहेत. परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे कॅन्सल डिड करण्यासाठी तेजवानी यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे. व्यवहार रद्द करण्यासाठी त्या हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!