Homeताज्या बातम्याभवानी पेठेतील ऑर्किड्स स्कूलवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे ; पत्रकार परिषदेत...

भवानी पेठेतील ऑर्किड्स स्कूलवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे ; पत्रकार परिषदेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवांनी दिले कागदपत्रांनिशी पुरावे…

ऑर्किड्स स्कूलच्या विरोधात बनावट प्रचार; १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात – शाळा व्यवस्थापनाची पत्रकार परिषद

पुणे, – भवानी पेठ परिसरातील अल्पसंख्यांक, सर्वसामान्य व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी ऑर्किड्स इंग्लिश स्कूल गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत असून, अत्यल्प शुल्कात शिक्षण देत असतानाही सध्या या शाळेच्या विरोधात काही समाजकंटकांकडून खोटा प्रचार करण्यात येत आहे. शाळा बेकायदेशीर असल्याचा अपप्रचार करत, एका बिल्डरच्या इशाऱ्यावरून शाळा बंद करण्याचा कट सुरू असून त्यामुळे १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष नासिर खान आणि सचिव शाहिदा नासीर खान यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

त्यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेची अधिकृत मान्यता प्राप्त असलेली ही शाळा दरवर्षी १००% निकाल देत असून, समाजातील दुर्बल घटकांच्या मुलांना शैक्षणिक संधी पुरवते. या शाळेमुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना देखील रोजगार मिळालेला आहे.

बेकायदेशीर सोसायटी सदस्यांकडून शाळेच्या विरोधात मोहीम…

जय सहकारी गृहनिर्माण सोसायटी ही पुणे उपनिबंधकांनी बरखास्त केलेली असूनही, तिची बेकायदेशीर अध्यक्ष रुक्साना महंमद हुसेन फल्लाह आणि इतर काही सदस्य सातत्याने शाळेविरोधात खोटे आरोप करीत आहेत. त्यांच्या आरोपांमागे एका बिल्डरचा स्वार्थ असून, शाळा हटवून त्या जागेवर इमारती उभारण्याचा प्रयत्न चालवण्यात येतो आहे, असेही शाहिदा खान यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल ऑडिट स्पष्ट – शाळा सुरक्षित

मनपाकडून ८ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनंतर ऑर्किड्स स्कूलच्या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल मनपाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे (COEP) चे चार्टर्ड इंजिनिअर इंद्रकुमार जगताप यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी करून ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट, २०२३ मध्ये बिल्डरकडून कोणत्याही कायदेशीर कराराशिवाय स्वतःच्या लेटरहेडवर केलेला ऑडिट बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोसायटी सदस्यांचे गैरव्यवहार उघड

शाहिदा खान यांनी म्हटले की, सोसायटीचे सदस्य आपापल्या फायद्यासाठी तीन बिल्डरशी करार करून कोणताही जुना करार रद्द न करता व NOC न घेता नवीन करार करीत आहेत. शिवाय ९४०० स्क्वेअर फूट जागा बेकायदेशीरपणे एका सदस्याच्या नावावर करण्यात आली असून, ५ हजार स्क्वेअर फूट जागा एका ओवेरा बिल्डरला विकली आहे. ही सर्व कृत्ये गंभीर स्वरूपाची असून, त्यामागे आर्थिक घोटाळ्यांचा संशय व्यक्त करण्यात आला.

उच्च न्यायालयाचा शाळेला दिलासा

या प्रकरणात २०१९ साली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत शाळेच्या बाजूने निकाल लागला होता. कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की, शाळा बेकायदेशीर असल्यास मनपाने कारवाई करावी. त्यानंतर मनपाने शाळेची पाहणी करून शाळा पूर्णपणे अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र दिले.

मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रार

या सर्व पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या बेकायदेशीर सोसायटी सदस्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

शाळा चालू ठेवण्यासाठी समाजाचा पाठिंबा आवश्यक…

शेवटी, शाहिदा खान यांनी सर्व पालक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना विनंती केली की, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या शाळेला वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. समाजाने एकत्र येऊन अशा बेकायदेशीर व गुन्हेगारी प्रवृत्तींना विरोध केला पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!