पुणे : (पुणे 24 तास ब्युरो )
शुक्रवारी होणार्या धुलवडीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. आहे. ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरात वेगवेगळ्या भागात स्थानिक पोलिस आणि वाहतूक विभागाने तब्बल ८० पथके नेमण्यात येणार आहे़. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी २ पथके असणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून मध्यरात्री दिड वाजेपर्यंत नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली जाणार आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. होळीची राख घेऊन ती एकमेकांना लावण्याची पारंपारिक प्रथा आता मागे पडली आहे. उत्तर भारतीयांच्या वाढत्या प्रभावामुळे धुलवडीच्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यावेळी अनेक जण भांग पिणे, दारु पिऊन रंग एकमेकांवर उधळतात. तसेच ट्रिपल सीट बसून वाहनावरुन वेगाने जात असतात. अशा तरुणाईकडून अपघात होऊ नयेत, यासाठी शहर पोलीस दलाने विशेष मोहिम आखली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून मध्यरात्री दीड वाजेपर्यत सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येणार असून मद्य प्राशन करुन वाहन चालवत असेल तर त्यांच्यावर जागेवरच कारवाई करण्यात येणार आहे.
धुलवडीला अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असते. अशा पार्ट्यांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. अशा पार्ट्यांमधून अंमली पदार्थांचे सेवन होत नाही ना, याकडे पोलिसांकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
उत्सव साजरा करताना मद्यप्राशन करुन वाहन चालवू नका, असे आवाहन शहर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























