Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरीत सोडवा -माजी आमदार मोहन जोशी यांची...

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरीत सोडवा -माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

सातव्या वेतन आयोगाचा फरक पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना मिळावा, वारसा हक्काने नोकऱ्या मिळाव्यात आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांना दिले.

काँग्रेस पक्षाच्या या शिष्टमंडळात माजी नगरसेवक अविनाश बागवे, अनिता मकवाना, चंद्रकांत चव्हाण, प्रविण करपे, सुरेश कांबळे यांचा समावेश होता.

कॅन्टोन्मेंट बोर्डात कायमस्वरूपी सेवेत ३५० आणि कंत्राटी पद्धतीने नेमलेले २०० कर्मचारी सेवेत आहेत. यातील कायमस्वरूपी सेवेतील काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले असून, काहीजण सेविनिवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या ७२ वारसांनी वारसा हक्काने बोर्डात नोकरी मिळावी यासाठी आवश्यक ती वैद्यकीय प्रमाणपत्रे, कागदपत्रे बोर्डाकडे सादर केली आहेत. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. तरी वारसाहक्काने त्या ७२ जणांना बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी मोहन जोशी यांनी निवेदनात केली आहे.

कंत्राटी पद्धतीच्या सेवकांना नियमित मासिक वेतन मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. त्या तक्रारी दूर व्हाव्यात, सात, आठ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांची नेमणूक कायमस्वरूपी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू केला जात नाही. ही तफावत दूर केली जावी. याबाबतचा निर्णय तातडीने व्हावा. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिष्टमंडळाने सुचविलेल्या मागण्यांंनुसार कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देऊ, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी पाल यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!