- मेट्रो प्रवाशांना दिलासा
पुणे : (पुणे 24 तास )
पुणे मेट्रोच्या सेवेत प्रजासत्ताक दिनापासून दररोज एक तासांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजता सुरू झाल्यानंतर मेट्रो आता दहा ऐवजी रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान दर पंधरा मिनिटांनी चार फेऱ्या होणार आहेत अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर पूर्ण क्षमतेने मेट्रोची सेवा सुरू आहे. दररोज दीड लाखांपेक्षा अधिक वेळ प्रवासी या दोन मार्गीकांवर प्रवास करतात. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आता वाढ होत आहे. बहुतांश प्रवाशांनी आपली खासगी वाहने घरी ठेवून, मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत मेट्रोची सेवा सुरू असावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार मेट्रो प्रशासनाने रात्री 10 ऐवजी आता अकरा वाजेपर्यंत मेट्रो ट्रेनची सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मेट्रो हे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चौकट :-
अशी असणार पुणे मेट्रोची सेवा…(दिनांक २६ जानेवारी २०२५ पासून लागू)
पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाईन)
– मेट्रो सेवा वेळ :- ०६:०० ते ११:०० (१७ तास)
वनाज ते रामवाडी (ऍक्वा लाईन)
– मेट्रो सेवा वेळ :- ०६:०० ते ११:०० (१७ तास)
मेट्रोसेवेची वारंवारता :-
- (कमी गर्दीची वेळ) –
- सकाळी ६ ते सकाळी ८ वा., सकाळी ११ ते दुपारी ४ वा., रात्री ८ ते रात्री १०
- या कालावधीत दर १० मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध राहील
– रात्री १० ते रात्री ११ वा., या कालावधीत दर १५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध राहील.
- (गर्दीची वेळ) –
- सकाळी ८ ते ११ वा., दुपारी ४ ते रात्री ८ वा.,
– या कालावधीत दर ७ मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध राहील.
कोट :-
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोच्या रोजच्या सेवेत एक तासांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री दहा ऐवजी आता अकरा वाजेपर्यंत मेट्रो ट्रेनची सेवा प्रवाशांना उपलब्ध असणार आहे. तसेच, रात्री दहा ते अकरा पुण्याच्या दरम्यान पंधरा मिनिटांच्या वारंवारितेनुसार प्रवाशांना मेट्रो ट्रेन स्थानकावर उपलब्ध होईल. या एका तासांच्या कालावधीत चार अतिरिक्त फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























