डॉ.अशोक बालगुडे, (ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक)
पुणे 24 तास:- मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्या काळात समाज प्रबोधन, विवेकवाद आणि निर्भीड विचार मांडण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. सत्य, तर्क आणि समाजहित या त्रिसूत्रीवर उभी राहिलेली ही पत्रकारिता आजही मार्गदर्शक ठरते.
आजच्या डिजिटल आणि वेगवान काळात पत्रकारितेची आव्हाने वाढली असली, तरी बाळशास्त्री जांभेकरांनी दिलेली मूल्याधिष्ठित दिशा अधिक महत्त्वाची ठरते. बातमी ही केवळ माहिती देण्यासाठी नसून समाजाचे भान जागे करण्याचे साधन आहे, ही जाणीव त्यांच्या कार्यातून प्रकर्षाने दिसून येते.
पत्रकार म्हणजे केवळ घटनांचा साक्षीदार नव्हे, तर समाजाचा सजग पहारेकरी असतो. सत्याच्या शोधात असताना संयम, अभ्यास, सामाजिक जबाबदारी आणि मानवी संवेदना जपणे, हीच खरी पत्रकारिता आहे. अफवा, टीआरपी, क्लिकबेटच्या पलीकडे जाऊन विवेकपूर्ण आणि निर्भीड लेखन करण्याची आज नितांत गरज आहे.
या ऐतिहासिक दिनी माझे सर्व पत्रकार गुरू, मार्गदर्शक, सहकारी आणि मित्रांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले लेखन समाजाला दिशा देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि लोकशाही मजबूत करणारे ठरो, हीच सदिच्छा.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह
























