
भवानी पेठ येथे महिलांना मकर संक्रातीचे वाण देताना चित्र वाघ, मनीषा लडकत, प्रीती कांबळे उपस्थित असताना
पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्र. 19 मध्ये मकरसंक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ भवानी पेठ येथील माजी नगरसेविका मनीषा संदीप लडकत यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ घेण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेश अध्यक्षा व विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ या उपस्थित होते.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक महिलेसाठी खास असतो हा कार्यक्रम खास होण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना समाजात वावरताना महिलांना सुरक्षितता मिळावी व महिलांना आर्थिक सक्षमीकरण योजना राबव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी महिलांना हळदीकुंकूचे वाण भेट देण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका मनिषा लडकत यांनी केले.
याप्रसंगी आमदार हेमंत रासने, मृणालिनी रासने, आमदार सुनील कांबळे, प्रीती सुनील कांबळे, माजी नगरसेवक संदीप लडकत, त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते..


महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























