Thursday, August 27, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यासाधू वासवानी यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त  विविध कार्यक्रम संपन्न*

साधू वासवानी यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त  विविध कार्यक्रम संपन्न*

पुणे ( पुणे 24तास)
थोर मानवतावादी संत, प्रेरक वक्ते साधू वासवानी यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त साधू वासवानी मिशन यांच्यातर्फे दि. १६ आणि १७ जानेवारी  या दोन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमांमध्ये प्रार्थना, सत्संग, प्रभात फेरी, लंगर, मध्यरात्रीचे जागरण यांसह साधू वासवानी, दादा जे. पी. वासवानी यांचे ध्वनिमुद्रित प्रवचन यांसह साधू वासवानी मिशनच्या विद्यमान प्रमुख दीदी कृष्णा कुमारीजी यांचे मार्गदर्शन असे प्रमुख कार्यक्रम पार पडले. साधू वासवानी यांच्या पवित्र स्मृतींना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली.
यामध्ये दि. १६ जानेवारीच्या कार्यक्रमांची सुरुवात पहाटे ५.३० वाजता दीदी कृष्णा कुमारीजी यांच्या नेतृत्वात प्रभातफेरीने झाली. साधू वासवानी यांच्या पवित्र समाधी स्थळापासून ही मिरवणूक निघाली आणि संपली. पुणे कॅम्प परिसरातील रस्त्यांवरून भजन आणि कीर्तनांचे यावेळी आयोजन करण्यात आले. यामध्ये साधकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. यांसह सेंट मीरा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मार्गावर गृहनिर्माण संस्थांनी साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्यप प्रतिमा उभारल्या होत्या. त्या सजवण्यात देखील आल्या होत्या. या प्रतिमासमोर दीदी कृष्णा कुमारीजी यांनी दीप प्रज्वलित केले.  या समारोप हवन, सत्संग आणि साधू वासवानीजी यांच्या ध्वनिमुद्रित प्रवचनाने झाला. दरम्यान, साधू वासवानी यांचे निधन झालेली वेळ सकाळी ८.२२ वाजता होती. त्या वेळेला या कार्यक्रमामध्ये स्तब्धता पाळून साधू वासवानी यांचे स्मरण करण्यात आले.

दुपारच्या सत्रामध्ये साधू वासवानी यांच्या कविता आणि गीतांचाप समावेश असलेल्या “नुरी ग्रंथाचे’ पठण करण्यात आले. तर, सायंकाळच्या सत्रात साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांचे रेकॉर्ड केलेले प्रवचन प्रसारित करण्यात आले. “जर तुम्ही इच्छेच्या मार्गावर गेलातय तर तुम्ही कधीही समाधानी होणार नाही,”  असे मार्गदर्शन पूज्य दादा वासवानी यांनी प्रवचनाच्या माध्यमातून केले. या दिवसाच्या कार्यक्रमांचा समारोप मध्यरात्री आयोजित करण्यात आलेल्या जागरणाने झाला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात हवन, सत्संग, पवित्र नुरी ग्रंथाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन आणि दीदी कृष्णा कुमारीजी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. साधू वासवानी यांचे जीवनकार्य आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या शिकवणींवर दीदींनी मार्गदर्शन केले. यानंतर गुरू लंगर प्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या दिवशी साधू वासवानी चौकात दीप यात्रा हा उपक्रमदेखील आयोजित करण्यात आला. या वेळी संतांनी दिलेल्या शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर  दादा जे. पी. वासवानी यांची ध्वनिमुद्रित प्रार्थना आणि साधू वासवानी यांच्या जीवन तसेच शिकवणींवर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. 

या दोन्ही पवित्र दिवशी साधू वासवानी मिशनने व्यापक सेवा उपक्रमांचे आयोजन केले. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागांतील शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन कपडे, रेड-लाइट एरियातील महिलांना साड्यांचे वाटप, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्याचे किट देण्यात आले. यांसह साधू वासवानी मिशनच्या जगभरातील केंद्रांनी या निमित्ताने सेवा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले.

साधू वासवानी यांच्याबद्दल अधिक माहिती :

साधू वासवानी हे भारताच्या आधुनिक काळातील दूरदर्शी संत होऊन गेले. त्यांनी सदैव महिला सक्षमीकरण, मूल्यांवर आधारित शिक्षण आणि सर्व धर्मांच्या एकतेबद्दल  आग्रही भूमिका मांडत जनजागृती केली. देशाच्या स्वातंत्र्यावेळी सत्याग्रह चळवळीत ते महात्मा गांधी यांचे जवळचे सहकारी होते. सन १९२९ मध्ये साधू वासवानी यांनी महिलांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी दररोजच्या मेळाव्याचे आयोजन केले. या उपक्रमाला “सखी सत्संग’ म्हणून ओळखले जाते. या निमित्ताने महिलांना कौटुंबिक कामकाजातून काही काळ शांतता मिळते. महिलांमध्ये एक मोठी क्षमता- महान शक्ती आहे, जी समाजाच्या कल्याणासाठी वापरली जाऊ शकते, हा विचार साधू वासवानी यांनी मांडला. सन १९३३ मध्ये त्यांनी मुलींसाठी मूल्य आधारित शिक्षणावर भर देणारी शाळा सुरू केली, जी “मीरा चळवळ’ म्हणून ओळखली जाते. या चळवळीला आता ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चळवळीच्या माध्यमातून सध्या १६ शाळा आणि महाविद्यालय चालविले जाते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!