
पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त परिवर्तन फाऊंडेशनचा प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आले.
यावेळी आयुष्यमान भारत प्रधानमंञी योजना व महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. उदय भुजबळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. उषा तपासे व डॉ. उदय भुजबळ आदी डॉक्टर वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी रक्त संकलन व तपासणी करिता डिंपल कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे लाभले.
शिबिराप्रसंगी सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिषेक गांगुर्डे, नवनाथ चकोर, अमित भोसले, रोहित भोसले, प्रमोद धावारे, लखन पडवळ, रूपेश आबनावे, संघरत्न कांबळे, आकाश शेवाळे, तात्यासाहेब धायगुडे, मयूर हिरवे, रविकांत बनसोडे, मनोज गायकवाड, आकाश मसलखाब , संदीप सोनवणे, मनीष गायकवाड, प्रशांत कचनवार आदी पदाधिकारी व सदस्यांनी केले.


महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























