Monday, August 17, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुण्याच्या महापौरपदावर ‘सूनबाई’चा डाव? भाजपच्या धक्कातंत्राची राजकीय खलबतं

पुण्याच्या महापौरपदावर ‘सूनबाई’चा डाव? भाजपच्या धक्कातंत्राची राजकीय खलबतं

पुणे २४ तास ः- पुणेकरांच्या राजकारणात नेहमीच गणितापेक्षा डावपेच वरचढ ठरतात. पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण जाहीर होताच भाजपकडून पुन्हा एकदा ‘धक्का’ देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पक्षातील निष्ठावंत, अनुभवी नगरसेविकांना डावलून थेट ‘सूनबाई’ंच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज वाढली आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदांच्या आरक्षण सोडतीत पुण्यासाठी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर भाजपमधील मंजुषा नागपुरे, निवेदिता एकबोटे, मंजुश्री खर्डेकर यांसारख्या अनुभवी नगरसेविकांची नावे स्वाभाविकपणे पुढे आली. मात्र, राजकारणाने नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळण घेतले.

वडगाव शेरी मतदारसंघात प्रभाव असलेल्या पठारे कुटुंबातील ऐश्वर्या पठारे यांचे नाव अचानक महापौरपदासाठी आघाडीवर येऊ लागले आहे. विमाननगर–लोहगाव प्रभागातून निवडून आलेल्या ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित असून, त्यांचे पती सुरेंद्र पठारे हेही नगरसेवक आहेत. त्यांचे सासरे बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार असल्याने ही निवड केवळ महापालिकेपुरती न राहता, व्यापक राजकीय संकेत देणारी ठरेल, असे मानले जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ऐश्वर्या व सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशानंतर लगेच उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी व्यक्त झाली होती. मात्र, मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पठारे दाम्पत्याने आपली राजकीय पकड दाखवून दिली.

महापौरपद महिला आरक्षणासाठी निश्चित झाल्याने भाजपच्या पहिल्या फळीतील अनेक नेत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. ‘आपलीच वेळ’ मानून बसलेल्या दिग्गजांचा हिरमोड झाला असून, संघटनात्मक निष्ठा की राजकीय गणित, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुण्यात भाजप आपली ‘धक्कातंत्राची’ परंपरा कायम ठेवून महापौरपदावर नवा प्रयोग करणार, की पक्षातील अनुभवी महिला नगरसेविकांनाच संधी देणार, याचा फैसला लवकरच होणार आहे. तोपर्यंत पुण्याच्या राजकीय वर्तुळात ‘महापौर कोण?’ हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

error: Content is protected !!