-विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात जोर राहणार
– ओडिसा ते विदर्भापर्यत कमी दाबाचा पट्टा कार्यरत
– बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासह कमी दाबाचा पट्टा
-कमाल तापमान घसरण्याची शक्यता
– विदर्भासाठी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटसह राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामाना विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्यापासून पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हाच कमाल तापमानाचा पारा 41 अंशापर्यत पोहचला आहे. बुधवारी देखील राज्यात कमाल तापमानाचा पारा सर्वात अधिक ब्रम्हपुरी येथे 41.5 अंश सेल्सिअस एवढा नोंदला गेला. मात्र अवकाळी पावसाचामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या ओडिसा ते विदर्भापर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झला आहे. यामुळे मध्य ते मध्य पूर्व भागापर्यत विस्कळीत वा-यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यात कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्राच्या तुरळक भागात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे, विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह हजेरी लावणार आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेश, छत्तीसगड,पश्चिम बंगाल, झारखंड, तसेच ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू. केरळ आंध्रप्रदेशासह इतर राज्यापर्यत आहे. त्यामुळे याही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे.याबरोबरच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होणार आहे. याच्याही प्रभावामुळे राज्यासह भारतातील इतर भागात अवकाळी पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे.
—————————–
चौकट
यलो अलर्ट :-
भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
————————–
पावसाच्या हलक्या सरी :-
धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर,सांगली.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























