Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगनवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती

नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती

सोबतच ४ नवीन शाखा कार्यालयांना मान्यता

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

दर्जेदार वीजसेवा व ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणच्या पिंपरी विभागातील सांगवी उपविभागाचे विभाजन करून नवीन हिंजवडी उपविभागाची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी या चार शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. नव्याने तयार झालेल्या हिंजवडी उपविभागाचे कार्यालय आणि नवीन चार शाखा कार्यालयांमध्ये एकूण ८८ तांत्रिक व अतांत्रिक नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत.

पुणे परिमंडल अंतर्गत पिंपरी विभागाच्या सांगवी उपविभागात यापूर्वी सांगवी, ताथवडे व हिंजवडी असे तीन शाखा कार्यालय होते. माहिती तंत्रज्ञानाच्या विविध कंपन्यांचे आयटी हब तसेच विजेसह नवीन वीजजोडण्यांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगवी उपविभागाच्या विभाजनाचा आणि नवीन हिंजवडी उपविभाग व चार नवीन शाखा कार्यालयांच्या निर्मितीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठवला होता. त्यास मंजूरी देत महावितरणने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.  

सांगवी उपविभागाच्या पुनर्रचनेत सांगवी उपविभागात आता सांगवी, पिंपळे गुरव (नवीन), पिंपळे निलख (नवीन) व वाकड (नवीन) असे चार शाखा कार्यालय राहतील तर नवीन हिंजवडी उपविभागात ताथवडे, हिंजवडी आणि हिंजवडी एमआयडीसी (नवीन) असे तीन शाखा कार्यालय राहतील. पूर्वीच्या सांगवी उपविभागात एकूण २ लाख ५६ हजार ग्राहक होते. पुनर्रचनेनंतर सांगवी उपविभागात १ लाख ४० हजार आणि नवीन हिंजवडी उपविभागात १ लाख १६ हजार वीजग्राहक असतील.

नवीन हिंजवडी उपविभाग कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नवनिर्मित पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड आणि हिंजवडी एमआयडीसी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत हिंजवडी, चाकण एमआयडीसी व भोसरी-२ या तीन उपविभागांची तसेच ११ शाखा कार्यालयांची तसेच नवीन ८८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडीसाठी नवीन उपविभाग व शाखा कार्यालयाबाबत वीजग्राहक व लोकप्रतिनिधींची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे वीज व ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होईल. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!